आपण आज काय खाल्लं, काय मजा केली, कुठलं नवीन ठिकाण पाहिलं, कुठे फिरण्यासाठी गेलो होतो वगैरे वगैरेबाबत सतत आपल्या वर्तुळातील मित्रांना, आप्तेष्टांना ‘अपडेट्स’ देत राहणं हा व्हॉट्सअ‍ॅपरूपी सोशल mh03मीडियातील ‘ट्रेण्ड’. अगदी एखाद्याने गमतीने स्वत:चे छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर टाकून त्याखाली ठळक अक्षरात ‘कैलासवासी अमूक अमूक,’ असे लिहिले तरी मित्र ती भंकसच समजतात. मात्र, असा प्रकार खरोखरच घडला तर तो नक्कीच धक्कादायक असतो. सांगली जिल्ह्य़ातील वाळवा या गावात हा प्रकार घडला. महादेव कुंभार (२२) या तरुणाने स्वत:चे छायाचित्र काढून श्रद्धांजली वाहणारा मजकूर व्हॉट्सअ‍ॅपवर टाकला आणि नंतर त्याने खरोखरच आपल्या आयुष्याचा शेवट करून घेतला.
गावोगाव भटकून मोलमजुरी करत पोटाची खळगी भरणाऱ्या कुंभार कुटुंबात वाढलेला महादेव कारखान्यात कंत्राटी काम करून महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. महादेवने रविवारी व्हॉट्सअ‍ॅपवर स्वतचे छायाचित्र टाकून त्याखाली ‘कै. महादेव कुंभार यांना भावपूर्ण श्रद्धांजली’ असा मजकूर टाकून आपल्या वर्तुळातील मित्रांना मोबाइलवर पाठवला. महादेवच्या मित्रांनी हा संदेश तितक्याशा गांभीर्याने घेतला नाही. सोमवारी आई-वडील कामाला गेल्यानंतर महादेवने गळफास लावून घेत आत्महत्या केली. महादेवच्या मृत्यूची बातमी ऐकून मित्रांना धक्काच बसला. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही.

Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?