बॉलीवूड किंग खान शाहरुखने चेन्नई पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. त्याने मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटींचा धनादेश सुपूर्द केलायं.
शाहरुखची निर्मिती कंपनी असलेल्या रेड चिलीज् एन्टरटेंमेन्ट आणि दिलवालेच्या टीमतर्फे एक कोटींची मदत करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना पत्र लिहलेय. याआदी दक्षिणात्य कलाकरांनी पूरग्रस्तांना मदत केली. यात सुपरस्टार रजनीकांत, त्यांचा जावई, अल्लू अर्जुन, महेश बाबू यांसह अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश आहे.
चेन्नई आणि तामिळनाडूला पूराने झोडपले असून आतापर्यंत २४५ लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती तामिळनाडू सरकारने दिली आहे. या पूराचा तडाखा वाहतूक यंत्रणा आणि दूरध्वनी विभागालाही बसला.
संग्रहित लेख, दिनांक 8th Dec 2015 रोजी प्रकाशित
चेन्नई पूरग्रस्तांना शाहरुखची एक कोटीची मदत
शाहरुखने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना पत्र लिहलेय.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 08-12-2015 at 10:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan donates rs 1 crore for chennai flood victims