बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. बॉलिवूडचा किंग खान अशी त्याची ओळख आहे. शाहरुखने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. गौरी खानने नुकतंच शाहरुखच्या न आवडत्या चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान गौरीने हा खुलासा केला होता.

शाहरुख खान आणि गौरी खानच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. २००५ मध्ये कॉफी विथ करणच्या पहिल्या सीझनमध्ये ते दोघे सहभागी झाली होते. यावेळी गौरीला शाहरुखच्या न आवडणाऱ्या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली, “मला शाहरुखचा २००२ मध्ये प्रदर्शित झालेला शक्ती: द पॉवर हा चित्रपट अजिबात आवडत नाही.”

राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्याची अंगठी आहे फारच खास, फोटो पाहिलात का?

“मी शाहरुखवर टीका करते, असे मला वाटत नाही. पण जर एखादा चित्रपट वाईट असेल तर त्याला कौतुकाची गरज नसते आणि जर वाईट असेल तर त्याने ते स्वीकारायला हवे. एक प्रेक्षक म्हणून जर मला वाटत असेल की त्याने त्यात अतिपणा केला असेल तर मी त्याला ते सांगायला हवे”, असे गौरी म्हणाली.

यानंतर करणने गौरीला शाहरुखच्या काही वाईट चित्रपटांची नावे विचारली. त्यावर उत्तर देताना गौरी म्हणाली, “त्याचे अनेक चित्रपट हे चांगले असतात. मी त्याचे बरेच वाईट चित्रपट अद्याप पाहिलेले नाहीत. मला तरी मी ते बघितल्याचे आठवत नाही. त्यानंतर करणने शाहरुखच्या शक्ती: द पॉवर चित्रपटाचा उल्लेख केला.” त्यावेळी उत्तर देताना गौरी म्हणाली, “होय, हे पूर्णपणे असह्य होते. त्याची ही सर्वात खराब कामगिरी होती.”

‘नाटकाचे ‘प्रयोग’ का म्हणतात?’; चाहत्याच्या प्रश्नावर प्रशांत दामलेनं दिलं भन्नाट उत्तर

दरम्यान शक्ती: द पॉवर हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुखसोबत करिश्मा कपूर, नाना पाटेकर आणि संजय कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट १९९८ मधील तेलुगू चित्रपट अंतपुरमचा रिमेक असून तो अमेरिकन लेखिका बेट्टी महमूदी यांच्या चरित्रावर आधारित होता. या चित्रपटात शाहरुख जयसिंगच्या भूमिकेत दिसला होता.