नितीन गडकरींचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला

सत्ता गेली की जात आठवते, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला लगावला.

मुस्लीम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केले. त्यामुळे मुस्लीम समाजातून पाच टक्के आरक्षणाची जोरदार मागणी होत असूनही मुस्लिमांना आरक्षण देण्यास भाजपने तीव्र विरोधाचीच भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून समृद्ध देश निर्माण करण्यासाठी पावले टाकल्यावर कोणालाही आरक्षण मागण्याची वेळ येणार नाही, असे मत नितीन गडकरी यांनी भाजपच्या  कार्य समितीच्या बैठकीत व्यक्त केले.

भाजपच्या प्रदेश कार्य समितीच्या बैठकीच्या पाश्र्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना मुस्लीम आरक्षणाविषयी त्यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा राज्यघटनेनुसार धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, न्यायालयाचाही तसा निर्णय असल्याचे सांगितले.