भारतीय निवडणूक आयोगाकडून जिल्ह्य़ातील नवमतदारांना रंगीत मतदान ओळखपत्र वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. स्मार्टकार्ड आणि पॅनकार्डच्या धर्तीवर ही ओळखपत्र तयार करण्यात आली आहेत. बारकोड सुविधेमुळे बनावट मतदार, दुबार नावे, स्थलांतरित, मृत आणि गरहजर मतदारांची छाननी सोपी होणार आहे. नवीन मतदार नोंदणी झाल्यानंतर आयोगाच्या पुढील आदेशानंतर टप्प्याटप्प्याने जुन्या झालेल्या कृष्णधवल मतदान ओळखपत्रांचे रूपांतर रंगीत ओळखपत्रांमध्ये केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतदानासाठी छायाचित्रासह मतदारयाद्यांच्या अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे. समांतरपातळीवर नावनोंदणी केलेल्या मतदारांना रंगीत स्मार्टकार्ड सदृश डिजिटल फोटो आणि बारकोडसह पीव्हीसीच्या कार्ड वितरणाला सुरुवात झाली आहे. ही ओळखपत्रे बारकोड, डिजिटल छायाचित्रासह असल्याने सुरक्षित आहेत, असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे. बारकोड सुविधेमुळे बनावट मतदार, दुबार नावे, स्थलांतरित, मृत आणि गरहजर मतदारांची छाननी सोपी होणार आहे. त्यामुळे आगामी काळात अचूक मतदारांकडून मतदान होण्याची शक्यता आहे. छायाचित्रासह मतदान ओळखपत्रामुळे मतदार याद्यांमध्ये देखील पारदर्शकता, अचूकता आणि क्लिष्टपणा दूर होऊ शकणार आहे. तूर्तास निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, नवीन मतदार आणि पुरवणी यादीतील मतदारांचे रंगीत ओळखपत्र तयार करून वितरणाला सुरुवात झाली आहे, असेही मोनिका सिंह यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New voter id card election commission of india
First published on: 06-10-2017 at 04:34 IST