तटस्थ राहण्याच्या आदेशाला केराची टोपली

बहुचर्चित पुणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे मतांची सौदेबाजी झालीच. शेवटच्या टप्प्यात एका मतासाठी दोन लाखाचा बाजार झाल्याचे दिसून आले. या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा मनसे नेत्यांचा आदेश धुडकावून पिंपरीतील चारपैकी तीन नगरसेवकांनी मतदानाचा ‘हक्क’ बजावला.

[jwplayer vtVpMCjf]

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक शनिवारी झाली. मंगळवारी (२२ नोव्हेंबर) निकाल जाहीर होणार आहे. विद्यमान आमदार अनिल भोसले, भाजपचे अशोक येनपुरे, काँग्रेसचे संजय जगताप हे प्रमुख रिंगणात आहेत. बंडखोरी करून आव्हान निर्माण करणाऱ्या व नंतर माघार घेणाऱ्या माजी आमदार विलास लांडे यांचे नाव तांत्रिक कारणास्तव मतपत्रिकेवर राहिले होते. तथापि, त्यांनी भोसले यांना पाठिंबा दिला होता. या मतदारसंघाच्या निवडणुकीत मतांचा बाजार होण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. पाचशे व हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे काही काळ बाजार थंडावला होता. शेवटच्या दोन दिवसांत मात्र अपेक्षेप्रमाणे मतांचा बाजार गरम झालाच आणि एका मताला दोन लाख रुपये देण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रमुख उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत मतांची सौदेबाजी केल्याचे दिसून आले. पुढे तिकिटासाठी अडचणी नकोत म्हणून अनेकांनी या सौदेबाजीपासून चार हात दूर राहणे पसंत केले. मनसेच्या नगरसेवकांसाठी तटस्थ राहण्याचा पक्षादेश होता. तथापि, पिंपरीतील तीन सदस्यांनी मतदान ‘हक्क’ बजावला, मात्र एका नगरसेविकेने मतदान केले नाही.

तातडीच्या वेळी आम्ही पैशांसाठी अडवणूक करत नाही. नोटाबंदीच्या पाश्र्वभूमीवर रुग्णांकडून धनादेशही स्वीकारत आहोत. बाळाच्या नातेवाईकांची कुणीतरी दिशाभूल केली असावी. त्यांनी माझ्याशी वा जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला नाही. रुग्णालयाच्या बिलिंग विभागाने त्यांना रुग्णाला घेऊन येण्यास सांगितले होते. 

डॉ. संजय पठारे, वैद्यकीय संचालक, ‘रुबी हॉल’

[jwplayer r33reeos]