पुणे : कोलकाता येथून कामानिमित्त आलेल्या एका प्राध्यापकाचा एका तारांकित हाॅटेलमधील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी जलतरण तलावातील जीवरक्षक, तसेच तारांकित हाॅटेलच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुणे : लेझर बीमच्या विरोधात ग्राहक पंचायतीची मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका

हेही वाचा – ईडीकडून पुण्यात छापे; गुंतवणुकीच्या आमिषाने शंभर कोटींची फसवणूक

मोहित प्रमोद आगरवाल (वय ३५, रा. बी. के. पाॅल ॲव्हेन्यू, कोलकाता, पश्चिम बंगाल) असे मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. याबाबत अमर संतोष मनका (वय ३४, खराडी, नगर रस्ता) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेशखिंड रस्त्यावरील प्राईड हाॅटेलचे व्यवस्थापन, जलतरण तलावातील जीवरक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित आगरवाल सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. कोलकात्याहून ते पुण्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. एका संस्थेत त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गणेशखिंड रस्त्यावरील प्राईड हाॅटेलच्या जलतरण तलावात ते पोहण्यासाठी उतरले. त्यावेळी आगरवाल बुडाले. दुर्घटना घडली तेव्हा जलतरण तलाव परिसरात जीवरक्षक उपस्थित नव्हते. आगरवाल जलतरण तलावात बुडाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांना पाण्यातून जीवरक्षकांनी बाहेर काढले. हाॅटेल व्यवस्थापन, तसेच जीवरक्षकांच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक बाजीराव नाईक तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A professor died after drowning in the swimming pool of a hotel in pune pune print news rbk 25 ssb
First published on: 10-10-2023 at 15:41 IST