राज्य सरकारच्यावतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेकरिता (टीईटी) परिक्षा केंद्रावर उशीरा आलेल्या विध्यार्थ्यांना फटका बसला आहे. राज्यभरातून आलेल्या या परीक्षार्थी नियोजित वेळेत पोहचू शकले नसल्यामुळे त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नौपाडा पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्यानंतर परिक्षेची प्रक्रिया नियमित सुरु झाली. सकाळी उडालेल्या गोंधळानंतर परीक्षा संपेपर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात सरस्वती या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता म्हणझे डीएड आणि बीएडसाठी टीईटी परीक्षेचे आज सकाळी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा सुरु होण्यापूर्वी काही विध्यार्थी उशीरा पोहचल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. उशिरा पोहचलेले विध्यार्थी आम्हाला परिक्षा केंद्रात प्रवेश द्यावा अशी मागणी करत होते. परंतु केंद्रावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नकार दिल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.