आपल्याला एखाद्या इंग्रजी शब्दाचा अर्थ अडला की तो शोधण्यासाठी आपल्याकडे शेकडो पर्याय आहेत. गुगलवर तो शब्द टाकला की अगदी इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती अशा अनेक भाषांत त्याचे अर्थ आपल्याला मिळतील. हल्ली तर स्मार्टफोनमुळे शब्दकोशाचं अॅप्लिकेशनही आपल्याकडे उपलब्ध असते. अडलेला शब्द सर्च ऑप्शनमध्ये फक्त पेस्ट करायचा, एवढीच मेहनत आपल्याला घ्यावी लागते.

थोडक्यात काय तर स्मार्टफोनमुळे भल्यामोठ्या आणि जड शब्दकोशाचे दिवस गेले. पण जेव्हा अॅप किंवा इंटरनेट यासारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या, तेव्हा मात्र सगळ्यांनाच शब्दकोशाचीच मदत घ्यावी लागायची. आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे असं की आज आधुनिक शब्दकोशाचे जनक सॅम्युअल जॉन्सन यांची ३०८ वी जयंती आहे. त्यामुळे सॅम्युअल यांना गुगलने खास डुडल तयार करून मानवंदना दिली आहे.

Viral Video : ‘ऊंची है बिल्डिंग’ गाण्यावरील तरूणीचा धम्माल डान्स पाहा!

जॉन्सन यांचा शब्दकोश १७५५ मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. हा शब्दकोश तयार करण्यासाठी त्यांना नऊ वर्षे लागली, असं म्हणतात शब्दकोशाचे काम जॉन्सन फक्त दुपारच्यावेळेतच करत. त्याकाळातला हा काही पहिलाच शब्दकोश नव्हता. याआधीही अनेक शब्दकोश प्रकाशित झाले होते. पण या सर्व शब्दकोशांपेक्षा जॉन्सन यांचा शब्दकोश सर्वात वरचढ ठरला. या शब्दकोशामुळे जॉन्सन यांना खूप प्रसिद्धी लाभली. जॉन्सन यांच्या शब्दकोशानंतर बऱ्याच वर्षांनंतर ऑक्सफोर्ड शब्दकोश आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचा : शिक्षक असावा तर असा!; ‘ती’च्या कुत्र्यालाही क्लासमध्ये बसण्याची परवानगी दिली