आपण हॉटेलमध्ये जेवतो तेव्हा किंवा घरी जेवण बनवताना काही अन्न हे उरतेच. आपण या अन्नाचं काय करतो? तर ते फेकून देतो. अन्नाची किती नासाडी होते याची तर अनेकांना कल्पनाही नसते. हेच अन्न आपण जर गरजूंना दिलं तर त्यांचंही पोट भरेल असा विचार किती जण करतात?

आपल्या आजूबाजूला, रस्त्यावर असे कितीतरी लोक उपाशीपोटी झोपतात किंवा त्यांना एकवेळचं अन्नही मिळत नाही. आपल्याला ही परिस्थिती समजत असते पण याकडे आपण कानाडोळा करतो आणि निघून जातो. पण या जगात असेही काही लोक आहे जे खरंच त्यांची काळजी करतात. सध्या सोशल मीडियावर अनेकांची मने या मुलाने जिंकून घेतली आहेत. या तरूणाचे नाव आहे चरण प्रसाद. महिनाभरापासून उपाशीपोटी झोपणा-या एका वृद्ध महिलेला त्याने वाचवले.

व्हिडिओ: इथे शाळेत जायला सहा वर्षांची मुलं डोंगरकडा चढतात!

Viral Video : कोळ्याच्या जाळ्यात अडकला विषारी साप

त्याने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टनुसार एका अनोळखी क्रमांकावरून त्याला फोन आला होता. एक वृद्ध स्त्री उपाशीपोटी रस्त्याच्या कडेला झोपते, तिच्याकडे पाहायलाही कोण नाही असे फोनवर त्याला या व्यक्तीने सांगितले होते. चरण सांगितलेल्या पत्त्यावर गेला तर तिथे एक वृद्ध महिला मरणासन्न अवस्थेत त्याला दिसली. चरणने तिला खायला दिले. तिची प्रकृती अधिकच ढासळत चालली होती. त्याने तिला तातडीने रुग्णालयात नेले आणि तिच्यावर उपचारही केले. याची पोस्ट त्याने फेसबुकवर अपलोड केली आहे.
चरण मुळचा आंध्रप्रदेशमधला आहे. वेळीच तिला मदत केल्याने तिचे प्राणही वाचले आणि तिची प्रकृतीही सुधारत आहे. चरणच्या या चांगल्या कामासाठी त्याचे कौतुकही होत आहे. आतापर्यंत त्याची पोस्ट ४० हजारांहूनही अधिक लोकांनी शेअर केली आहे.