सकाळी अकरा वाजल्यापासून मुंबईतील सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरूवात झाली. गणेशगल्लीतील मुंबईचा राजा, लालबागचा राजा, तेजुकायाचा बाप्पा, चिंचपोकळीचा चिंतामणी, रंगारी बदक चाळीचा गणपती या मुंबईतील मानाच्या गणपतींनी निरोप देण्यासाठी लालबाग-परळ परिसरात मोठा जनसमुदाय जमला होता.