बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ही उद्योग नगरी अजब रक्तरंजित प्रेमप्रकरणाने हादरली!खामगाव नगरीत नवरात्र व जगदंबा देवी उत्सवामुळे भक्ती रसात न्हावून निघाली असताना व गरब्याची धामधूम सुरु असताना सजनपुरी परिसरात भीषण हत्याकांड घडले. प्रियकराने अगोदर प्रेयसीची निर्घृण हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली.
खामगाव नगरीत मंगळवारी, तेवीस सप्टेंबर रोजी रात्री उशिरा हा रक्तरंजित घटनाक्रमाचा थरार रंगला. घटना स्थळ असलेले हॉटेल रक्ताने अक्षरशः माखल्याचे भीषण चित्र होते. तसेच दोघा प्रेमी युगलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती सजनपुरी परिसरासह खामगांव शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. यानंतर घटनास्थळ असलेल्या हॉटेल जुगनू कडे पोलिसांसह खामगाव करानी धाव घेतली.
साहिल उर्फ सोनू राजपूत ( वय २२ वर्षे, राहणार साखरखेर्डा तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा )आणि ऋतुजा पद्माकर खरात ( राहणार शिंदी, तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा) अशी भीषण अंत झालेल्या प्रेमी व प्रेयसीची नावे आहे.
खामगाव शहरातील सजनपुरी येथील जुगनू हॉटेलमध्ये काल मंगळवारी रात्री उशिरा हे थरारक हत्याकांड घडले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहे. या घटनेने खामगाव हादरले असून, जुगनू हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
दोन्हीही प्रेमीयुगुल साखरखेर्डा परिसरातील रहिवासी असून, खामगाव येथे राहात असल्याचे कळते. आहे.सोनू राजपूत (वय २२) व ऋतूजा पद्माकर खरात, हे प्रेमीयुगुल खामगावजवळील सजनपुरी येथील हॉटेल जुगनूमध्ये थांबले होते. दरम्यान, काही कारणावरून त्या दोघांमध्ये वाद होऊन कडाक्याचे भांडण झाल्याची माहिती आहे. यामध्ये सोनू राजपूत याने ऋतुजाला चाकूने भोसकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. प्रेयसीची निर्घृण हत्या केल्या नंतर सोनू राजपूत यानेदेखील त्याच चाकूने स्वतःला भोसकून घेत आत्महत्या केली. या दोघांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती असून, या हॉटेलमध्ये ते वारंवार येत असल्याचे सांगण्यात आले .
दरम्यान, सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच खामगाव शहरात खळबळ उडाली. होता. घटनास्थळी पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक (खामगांव )श्रेणिक लोढा, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आदींसह पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या.मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात रवाना केला होता. घटनेचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार करीत आहे.