बुलढाणा : जिल्हा परिषदेच्या ६१ जागांचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने बुलढाणा जिल्हा परिषदेच्या तब्बल ३१ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यामुळे शेकडोच्या संख्येतील विविध पक्षीय इच्छुकांच्या इच्छा-आकांक्षांवर ऐन हिवाळ्यात पाणी फिरले आहे.
आता यातील काही इच्छुक उमेदवारांना आपल्या अर्धांगिणी, आई, बहीण अथवा वहिनी यांना रिंगणात उतरवावे लागणार आहे. विविध पक्षांनी उमेदवारी दिली नाही तर अनेकांवर बघ्याची भूमिका घेण्याची वेळ येणार आहे, तर अनेकांना प्रचाराची जवाबदारी सांभाळवी लागणार आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव एकूण १२ जागांपैकी ६, अनुसूचित जमातीच्या एकूण तीन जागांपैकी २, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण १६ जागांपैकी ८ जागा महिलांसाठी राखीव आहेत. ६१ पैकी ३१ मतदारसंघांत दिग्गज राजकीय परिवारातील महिलांच्या लढती रंगणार आहे. या जागा महिलांसाठी राखीव झाल्याने पुरुष मंडळींना नियोजनात बदल करावा लागणार आहे. मात्र तरीही या ३१ मतदारसंघांतील लढती मात्र चुरशीनेच पार पाडणार, हे तेवढेच खरे.
महिला राखीव गट
जळगाव जामोद तालुका
- आसलगांव : अनुसूचित जमाती,
- सोनाळा : अनुसूचित जमाती,
- बावणबीर : सर्वसाधारण.
संग्रामपूर तालुका
- पातुर्डा बु. : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
शेगाव तालुका
- जलंब – अनुसूचित जाती.
- नांदुरा : निमगांव : सर्वसाधारण
- मलकापूर : नरवेल, मलकापूर ग्रामीण व दाताळा : सर्वसाधारण महिलासाठी राखीव.
- मोताळा : धामणगांव बढे : सर्वसाधारण.
- खामगाव : सुटाळा बु. : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,
- पिंपळगांव राजा : सर्वसाधारण,
- कुंबेफळ : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
- मेहकर, देऊळगांव साकर्शा : सर्वसाधारण,
- कळंबेश्वर : अनुसूचित जाती,
- उकळी: सर्वसाधारण.
- चिखली : अमडापुर : सर्वसाधारण, सवणा : सर्वसाधारण,
- केळवद : अनुसुचीत जाती,
- शेळगाव आटोळ : नागरिकांचा मागास प्रवर्ग,
- मेरा बु.: अनुसूचित जाती.
बुलढाणा तालुका
- देऊळघाट : सर्वसाधारण,
- सुंदरखेड : अनुसूचित जाती,
- साखळी बुद्रुक.: सर्वसाधारण, धाड : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,
- रायपूर : सर्वसाधारण.
- सिंदखेड राजा, साखरखेर्डा : सर्वसाधारण,
- शेंदुर्जन : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,
- दुसरबीड : अनुसूचित जाती,
- वर्दडी बु. : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
- लोणार, पांग्रा डोळे : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
दृष्टिक्षेपात ‘महिलाराज’
- एकूण जागा ६१
- महिला राखीव ३१
- अनु. जाती ६
- अनु. जमाती २
- ओबीसी ८
- खुला १५