बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील संग्रामपूर तालुक्यातील दुर्गम भागातील पिंप्री आडगाव या गावात अतिसाराची मोठ्या प्रमाणात झाल्याचे वृत्त आहे.

दूषित पाणी पुरवठ्या मुळे डायरीयाची लागण झाली आहे. ऐन दिवाळी सणाच्या धामधूमीत अतिसाराने हातपाय पसरले असून आबालवृद्ध गावकऱ्यांना लागण झाल्याने पिंप्री आडगाव या दुर्गम भागातील गावकरी हवालदिल झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार या गावांमध्ये नळ योजना कार्यान्वित नाही. शेकडो ग्रामस्थांना एका विहिरीवरून पाणी भरावे लागते.

विहिरीला जे झरे फुटलेले आहेत ते दूषित पाण्याचे असल्यामुळे या ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली. गावात अनेकात उलट्या, संडास, मळमळ अश्या लक्षणाची अनेक रुग्ण आहे. मागील काही दिवसापासून डायरीया गावात ठाण मांडून असल्याचे गावकर्यांनी सांगितले. तसेच विहिरीवर जाळी बसविली असून त्यावर माकड बसतात आणि शौच व मूत्रविधी करतात. तेच पाणी आम्हाला प्यावे लागते असं ग्रामस्थ सांगतात.

मते मागायला येतात आता कोणीच नाही आलं…

अतिसाराची लागण झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा गावात आली नसल्याचा आरोप गावकर्यांनी केला. आरोग्य यंत्रणा या ठिकाणी पोहोचलीच नसून त्यांनाच यांना खाजगी रुग्णालयात जावे लागते. किंवा किमान सात किलोमीटर दूर कच्चा रोड पार करत वानखेड ( तालुका संग्रामपूर ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतःच्या खर्चाने जावे लागते. दिवाळीच्या उत्सवात देखील गावावरील अतिसाराच संकट कायम आहे.गावातील संतप्त महिलांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी समवेत बोलतांना बोलतांना वरील माहिती दिली.

महिला म्हणाल्या की, ग्राम पंचायतचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. निवडणुका असल्या तर सरपंच आणि इतर पदाधिकारी, पुढारी गावात येतात. मात्र गावात अतिसाराच थैमान असतांना मात्र ग्रामपंचायत चे कुणीच लक्ष डेट नाहीये. यामुळे गावकरी भयभीत झाल्याचे चित्र आहे.

आरोग्य विभाग म्हणतो साथ नियंत्रणात

दरम्यान जिल्हा आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी गावातील साथ नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. काही दिवसापूर्वी दहा बारा रुग्ण आढळले होते. उपचार नंतर ते बरे झाले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर मारोडे व वानखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी डॉक्टर कड यांनी गावात भेट दिली.

विहिरीतील जल नमुन्याचा अहवाल ‘ओटी निगेटिव्ह’ आला आहे. त्याची माहिती ग्राम पंचायतला देण्यात आले असून त्यांनी तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे. दूषित पाण्यामुळेच ग्रामस्थ बाधित झाले आहे, असे या सूत्राने स्पष्ट केले.