भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील न्यायालयीन लढाई सात वर्षांपासून सुरू आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने १ जुलै रोजी दिलेल्या निर्णयानुसार, शमीने पत्नी हसीन जहाँला दरमहा १.५ लाख रुपये आणि मुलीला २.५ लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. २०१८ साली हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी छळ आणि मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते.