प्रीती झिंटा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने हिंदीबरोबरच तेलुगु, पंजाबी चित्रपटांतही काम केलं आहे. ‘क्या कहना’ हा प्रीती झिंटाचा पहिला चित्रपट होता. पण हा चित्रपट २००० साली प्रदर्शित झाला. त्यामुळे १९९८ साली प्रदर्शित झालेला ‘दिल से’ हा चित्रपट प्रीतीचा बॉलिवूड पदापर्णाचा हिट चित्रपट ठरला. पदार्पणाच्या चित्रपटानेच तिला लोकप्रियता मिळवून दिली. ‘सोल्जर’, ‘दिल चाहता है’, ‘दिल है तुम्हारा’, ‘कल हो ना हो’, ‘कोई मिल गया’, ‘लक्ष’, ‘सलाम नमस्ते’, ‘वीर झारा’ हे प्रीती झिंटाचे गाजलेले हिंदी चित्रपट. २०१६ साली प्रीती झिंटाने १० वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन जीन गुडइनफशी लग्नगाठ बांधली. नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रीती झिंटा सरोगसी पद्धतीने आई झाली. जय व जिया अशी तिच्या जुळ्या मुलांची नावे आहेत.Read More
Vaibhav Suryavanshi IPL: वैभव सूर्यवंशीचे चाहते त्याच्या शतकाबद्दल सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन करत आहेत. त्याच्या शतकी खेळीनंतर चित्रपट विश्वातूनही प्रतिक्रिया…