बँकिंग क्षेत्रातील विविध कायदेकानूंच्या पालनाविषयक दक्षता घेणाऱ्या कम्प्लायन्स अधिकारी घडविणाऱ्या नव्या ‘सर्टिफाइड बँकिंग कम्प्लायन्स कोर्स’ या व्यावसायिक अभ्यासक्रमाची अलीकडेच रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉ. के. सी. चक्रवर्ती यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात घोषणा करण्यात आली. इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडिया (आयसीएसआय) आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग अॅण्ड फायनान्स (आयआयबीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम चालविला जाणार आहे. ऑनलाइन परीक्षा आणि नियमित वर्गातील प्रशिक्षण असे या अभ्यासक्रमाचे स्वरूप असेल. सध्या नियमपालनाचा अभाव आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होणारा नियमभंग ही बाब खर्चीक तर आहेच, शिवाय बँकांच्या प्रतिष्ठेलाही बट्टा लावणारी असून, हा अभ्यासक्रम या संबंधाने दुरुस्तीच्या दृष्टीने मोठी भूमिका बजावेल, असा विश्वास डॉ. चक्रवर्ती यांनी या वेळी व्यक्त केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 24, 2013 1:01 am