केंद्र सरकारनं देशातील नोकदारांना मोठा धक्का दिला असून ईपीएफच्या (EPF) कपात करण्यात आली आहे. मोदी सरकारने पीएफचे व्याजदर ०.१५ टक्क्यांना घटवले आहेत.

सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता नोकरदारांना २०१९-२०मध्ये जमा झालेल्या त्यांच्या ईपीएफवर ०.१५ टक्के कमी व्याज मिळेल. २०१८-१९मध्ये हा व्याजदर ८.६५ टक्के होता. आता ८.५० टक्के व्याज मिळेल. ईपीएफओच्या विश्वस्तांच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक पातळीवर फारसी चांगली कामगिरी होत नसल्याने ईपीएफओच्या गुंतवणुकीला फटका बसला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

ईपीएफओने ईपीएफवरील व्याजदर ८.५ टक्के करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी दिली.