विविध बँकांमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्यांची संख्या १५ टक्क्यांनी उंचावली असून गेल्या वित्त वर्षांत ही रक्कम ७१ हजार ५४३ कोटी रुपयांवर गेली आहे. रकमेबाबत हे प्रमाण ७३.८ टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती समोर आली आहे.

मार्च २०१९ अखेरच्या वर्षांत ६ हजार ८०१ बँक घोटाळ्यांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. २०१७-१८ मध्ये ही संख्या ५ हजार ९१६ होती व त्यातील रक्कम ४१ हजार १६७.०४ कोटी रुपये होती. बँक घोटाळे नोंदीत सर्वाधिक हिस्सा सार्वजनिक बँकांचा राहिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा बँकांमधील घोटाळ्यांची प्रकरणे ३ हजार ७६६ व त्यातील रक्कम ६४ हजार ५०९.४३ कोटी रुपये नोंदली गेली आहे. १०० कोटी रुपयांवरील रकमेच्या घोटाळ्यांतील रक्कम ५२ हजार २०० कोटी आहे. कार्ड, इंटरनेट तसेच ठेवींबाबत झालेल्या घोटाळ्याचे प्रमाण ०.३ टक्के आहे. हा अहवाल दरवर्षी प्रदर्शित करण्यात येतो. रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वी डिविडंट आणि सरप्लस फंडातून सरकाला १.७६ कोटी रूपयांची निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी रिझर्व्ह बँक १.२३ लाख कोटी सरप्लस फंडातून तर उर्वरित ५२ हजार ६३७ कोटी सरप्लर रिझर्व्हमधून देण्यात येणार आहेत.