News Flash

‘एसआयपी’ गुंतवणूक आता अधिक जलद

‘नॅश’ ही एक बँकिंग सेवा असून याच्या माध्यमातून एसआयपी हप्ते, विमा हप्ते, कर्जाचे हप्ते, या सारखी देणी स्वयंचलित पद्धतीने होत असतात.

मुंबई : नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या (एसआयपी) माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीची सध्या वेळखाऊ असलेल्या नोंदणी प्रक्रियेला आता गती मिळणार  आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या नुकत्याच झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत ‘नॅश’ सेवा आठवडय़ाचे सातही दिवस आणि दिवसाचे २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. एसआयपीसाठी ‘नॅश’ (एनएसीएच) ची नोंदणी करण्यास किमान १४ दिवसांचा अवधी लागतो.

‘नॅश’चे व्यवस्थापन ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’कडून केले जाते. सध्या हे काम बँक कामकाजाच्या दिवशी केले जाते. आठवडय़ाचे सातही दिवस आणि २४ तास ‘नॅश’ नोंदणी सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे नवीन ‘नॅश’ नोंदणीची प्रक्रिया  २१ दिवसांऐवजी चार ते पाच दिवसांमध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ‘एसआयपी नोंदणीच्या टप्प्यांपैकी  ‘नॅश’ नोंदणी हा सगळ्यात वेळखाऊ टप्पा आहे. या बदलाचे मी स्वागत करतो आणि त्यामुळे गुंतवणुकीची प्रक्रिया अधिक सुलभ होईल’, अशी प्रतिक्रिया एमएफ यूटीलिटी या मंचाचे मुख्य कायर्कारी अधिकारी  गणेश राम यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.

‘नॅश’ ही एक बँकिंग सेवा असून याच्या माध्यमातून एसआयपी हप्ते, विमा हप्ते, कर्जाचे हप्ते, या सारखी देणी स्वयंचलित पद्धतीने होत असतात. ‘नॅश’चे माध्यमातून मोठय़ा प्रमाणात देयके दिली जातात.

‘नॅश’च्या माध्यमातून गुंतवणूकदाराला शेअर बाजाराच्या म्युच्युअल फंड मंचावर म्युच्युअल फंडमध्ये एकरकमी किंवा एसआयपीचे व्यवहार करता येतात. त्यासाठी प्रत्येक वेळी धनादेश द्यावा लागत नाही. एकदा नोंदणी केल्यानंतर बँक खात्यातून ठरावीक तारखेला, ठरलेली रक्कम म्युच्युअल फंडात गुंतविली जाते. ‘नॅश’च्या माध्यमातून ठराविक रक्कम ऑटो-डेबिट करण्याचे अधिकार असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 3:17 am

Web Title: sips investment is faster now ssh 93
Next Stories
1 विमा कंपनीतील हिस्सा ‘पीएनबी’ विकणार
2 नामको बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत धात्रक
3 टाटा डिजिटलची क्युरीफिटमध्ये ७.५० कोटी डॉलरची गुंतवणूक
Just Now!
X