अलीकडच्या काळात प्रारंभिक खुल्या भागविक्रीत घवघवीत यश मिळविलेल्या अल्केम लॅबोरेटरीज आणि डॉ. लाल पॅथलॅब्स या कंपन्यांच्या समभागांची येत्या २३ डिसेंबरला बाजारात नोंदणी होणार आहे. अनुक्रमे औषधनिर्माण व आरोग्यनिदान क्षेत्रातील या कंपन्यांच्या समभागांची सूचिबद्धता मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात होईल.
प्रति समभाग १,०५० रुपये वितरण किंमत निश्चित केलेल्या अल्केम लॅबोरेटरीजने भागविक्रीतून १,३५० कोटी रुपये उभारले. या भागविक्रीला गुंतवणूकदारांकडून ४४.२९ पटीने भरणा झाला, तर डॉ. लाल पॅथलॅब्सच्या भागविक्रीला ३३.४१ पट प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने प्रति समभाग ५४० ते ५५० रुपये किंमतीत (व्यक्तिगत गुंतवणूकदारांना १५ रु. सवलतीसह) भागविक्री करून ६३८ कोटी रुपये उभारले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 18th Dec 2015 रोजी प्रकाशित
अल्केम, लाल पॅथलॅब्स समभागांचे २३ डिसेंबरला बाजारात पदार्पण
१,०५० रुपये वितरण किंमत निश्चित केलेल्या अल्केम लॅबोरेटरीजने भागविक्रीतून १,३५० कोटी रुपये उभारले.
Written by झियाऊद्दीन सय्यद
First published on: 18-12-2015 at 03:49 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alkem dr lal pathlabs to make stock market debut on december