Gold-Silver Price on Saturday, 24 September 2022 In Maharashtra. | Loksatta

Gold-Silver Price on 24 September 2022: सोने-चांदीच्या दरात पाहायला मिळतेय घसरण; आजचा भाव काय? जाणून घ्या

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Gold-Silver Price on 24 September 2022: सोने-चांदीच्या दरात पाहायला मिळतेय घसरण; आजचा भाव काय? जाणून घ्या
आजचा सोने-चांदीचा भाव (फोटो: Reuters)

Gold- Silver Price Today : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४६,५०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,०१० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५६,८०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ५८,००० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,५०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,७३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,५३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,७६० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,५३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,७६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,५३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,७६० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५६८ रुपये आहे.

Petrol-Diesel Price on 24 September 2022: पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने घसरण; किती रुपयांनी कमी झाली किंमत?

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

विश्लेषण : सोन्याची किंमत ठरते कशी? नेमके कोणते घटक ठरतात कारणीभूत? जाणून घ्या सविस्तर!

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विक्रीच्या वादळाचा ‘सेन्सेक्स’ला १,००० अंशांचा फटका

संबंधित बातम्या

Gold-Silver Rate Today: लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आजचा भाव
Gold-Silver: आजचा १० ग्रॅमचा भाव किती? जाणून घ्या
Gold-Silver; नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी दरात घसरण; जाणून घ्या १० ग्रॅमचा भाव
Gold-Silver Rate Today: सोने-चांदीचे दर स्थिर, जाणून घ्या आजचा १० ग्रॅमचा भाव
Gold-Silver Rate Today: एक तोळा सोन्याचा दर ४८ हजाराहून अधिक; चांदीही झाली महाग; जाणून घ्या आजचा भाव

व्हिडिओ

ताज्या बातम्या
खळबळजनक! धावत्या लक्झरी बसमध्ये आढळला रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह
पुणे: विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य गटाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर
‘गद्दार’ वादावर पडदा, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मनोमिलन; मुख्यमंत्री म्हणाले, “राहुल गांधींनी आम्हाला…”
Gujarat Election 2022: “स्मृती इराणींच्या प्रचारसभेला उपस्थित राहा”, शिक्षकाचा विद्यार्थ्यांना आदेश
मोठी बातमी: अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली