१७ एप्रिल १८६०
भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला गेला तो दिवस. ईस्ट इंडया कंपनीकडून भारत देशाचा कारभार इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरीत झाल्यानंतर दोन वर्षांनी हा अर्थसंकल्प मांडण्यात आला.
भारताचे पहिले वित्तीय सभासद जेम्स विल्सन यांनी हा अर्थसंकल्प मांडला.
१९४७-४८
या वित्तीय वर्षांसाठी तत्कालीन अंतरीम सरकारचे अर्थमंत्री लियाकत अली खान यांनी अर्थसंकल्प सादर केला.
२६ नोव्हेंबर १९४७
रोजी आर.के.षण्मुखम् चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा अखंड अर्थसंकल्प सादर केला.
१ एप्रिल ते ३१ मार्च
असे अíथक वर्ष मानण्यास १८६७ पासून सुरुवात झाली. त्याआधी 1 मे ते 30 एप्रिल हे वित्तीय वर्ष मानले जाई.
संविधान आणि परंपरा
*भारताच्या राज्यघटनेत अर्थसंकल्प या शब्दाचा उल्लेख नाही.
*राज्यघटनेतील 112 व्या कलमामध्ये, भारताच्या विद्यमान सरकारने संसदेच्या पटलावर वार्षकि वित्तीय विवरणपत्र (जे आपण अर्थसंकल्प म्हणून ओळखतो) सादर करण्याविषयीची तरतूद करण्यात आली आहे.
*केंद्रीय अर्थमंत्री फेब्रुवारी महिन्यातील कामकाजाच्या अखेरच्या दिवशी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करतात.1999 पूर्वी हाच अर्थसंकल्प सायंकाळी 5 वाजता सादर केला जात असे.
अर्थसंकल्पाचे मूलाधार
वित्तीय आवक
सरकारी तिजोरीतील पशांची आवक आणि अनुमानित खर्च यांच्या आधारे अर्थसंकल्प तयार केला जातो.
रद्दबातल होणे
एखाद्या विशिष्ट कामासाठी तरतूद करण्यात आलेला निधी जर वर्षांखेरीस वापरला गेला नसेल तर आपोआप रद्दबातल ठरतो.
अर्थसंकल्पाचे एकक
अर्थसंकल्प हा खातेनिहाय पद्धतीने सादर केला जातो.
महत्त्वाचे दस्तावेज
*वार्षकि वित्तीय विवरण पत्र
*अनुदानाच्या मागण्या
*लेखानुदान विषयक मागण्या
*जावक अर्थसंकल्प – भाग 1
*जावक अर्थसंकल्प – भाग 2
*वित्त विधेयक
*वित्तीय विधेयकातील तरतुदी समजाऊन सांगणारे विवेचन
’अर्थसंकल्प – एका दृष्टीक्षेपात
*अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी
*विविध घोषणांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती
*वित्तीय जबाबदारया आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा यांच्याशी संबंधित कागदपत्रे
*अर्थसंकल्पीय भाषण अर्थात अर्थसंकल्पाची किल्ली
पैशाची आवक-जावक
*  कर महसूल
*  कर्जे आणि ऋण
अन्य आवक
*  वित्त मंत्रालय
*  योजनाबा सहाय्य
*   योजनाबाह्य खर्च
*  योजनांवरील खर्च
*   राज्ये आणि
*  केंद्रशासित प्रदेश
*  राज्यांच्या योजनांना देण्यात येणारे केंद्राचे अर्थसहाय्य
*  केंद्रीय योजनांचा आराखडा