हिताची सिस्टिम्स मायक्रो क्लिनिक या भारतातील आघाडीच्या आयटी सेवा आणि उपाययोजना पुरवठादाराने आपल्या भारतातील व्यवसायाची २५ वष्रे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने कंपनीने २०१७ पर्यंत ६०० कोटी रुपयांच्या व्यवसाय वाढीचे लक्ष्य ठेवले आहे. हिताची सिस्टिम्स मायक्रो क्लिनिक ही आघाडीची आयटी सेवा आणि उपाययोजना पुरवठादार म्हणून गणली जाते. कंपनीचे संपूर्ण भारतात अस्तित्व असून १६ शाखा व १८० पेक्षा अधिक सेवा स्थाने आहेत.
भारतातील वाटचालीबद्दल हिताची सिस्टिम्स मायक्रो क्लिनिकचे व्यवस्थापकीय संचालक तरुण सेठ म्हणाले की, भारतासारख्या अत्यंत स्पर्धात्मक आयटी बाजारपेठेत वाटचाल करणाऱ्या या कंपनीने ग्राहकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार उच्च मूल्य उपाययोजना आणि सेवा देऊन संपूर्ण भारतात अस्तित्व प्रस्थापित केले आहे.
हिताची सिस्टिम्स मायक्रो क्लिनिक्स विविध उद्योगांच्या उत्पादनांसाठी वैविध्यपूर्ण आयटी आवश्यकतांवर काम करत असून त्यात सरकारी/सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना, बीएफएसआय, आयटी/आयटीईएस, उत्पादन, रिटेल, ऑनलाईन, मीडिया, आदरातिथ्य/आरोग्यसेवा, ऑटोमोबाइल्स, प्रवास आणि लॉजिस्टिक्स यांचा समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Sep 2015 रोजी प्रकाशित
हिताची सिस्टिम्स मायक्रो क्लिनिकचे व्यवसाय विस्तार लक्ष्य
हिताची सिस्टिम्स मायक्रो क्लिनिक या भारतातील आघाडीच्या आयटी सेवा आणि उपाययोजना पुरवठादाराने आपल्या भारतातील व्यवसायाची २५ वष्रे पूर्ण केली आहेत.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 08-09-2015 at 07:50 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hitachi systems micro clinic s target of growth