scorecardresearch

Income Tax Return : मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी ITR भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक? जाणून घ्या

जेव्हा तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर आयटीआर ऑनलाइन भराल, तेव्हा तुम्हाला तेथे दोनपैकी कोणताही एक फॉर्म निवडण्याचा पर्याय मिळेल.

What documents are required to fill ITR
प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? जाणून घ्या (Photo : Indian Express)

आयकर भरणारे आता मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी ई-फायलिंग पोर्टलवर आयकर रिटर्न भरू शकतात. जेव्हा तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर आयटीआर ऑनलाइन भराल, तेव्हा तुम्हाला तेथे दोनपैकी कोणताही एक फॉर्म निवडण्याचा पर्याय मिळेल. आयटीआर फॉर्म-१ आणि आयटीआर फॉर्म-४, यापैकी तुम्हाला एक पर्याय निवडावा लागेल. बहुतेक करदाते या फॉर्मचा वापर करून त्यांचे कर भरतात. या फॉर्ममधील बहुतांश माहिती आधीच भरलेली असते जी करदात्याला पडताळून पाहावी लागते. याशिवाय चुकीची माहिती असल्यास ती दुरुस्त करावी लागते.

आयटीआर फॉर्म-१ कोणी भरावा?

ज्यांचे पगार, मालमत्ता, व्याज आणि कृषी उत्पन्न यासह एकूण उत्पन्न ५० लाखांपर्यंत आहे, अशा लोकांना हा फॉर्म भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला पगारातून मिळणारे उत्पन्न, घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न, व्याजातून मिळणारे उत्पन्न, लाभांशातून मिळणारे उत्पन्न याची माहिती जाहीर करावी लागेल. या व्यतिरिक्त कोणत्याही मार्गाने तुमचे उत्पन्न येत असल्यास, तुम्ही आयकर रिटर्न भरण्यासाठी हा फॉर्म वापरू शकत नाही.

Income Tax Return : वर्ष २०२२-२३ साठी लवकरात लवकर भरा ITR; अन्यथा भरावा लागेल दंड; जाणून घ्या शेवटची तारीख

आयटीआर फॉर्म-४ कोणी भरावा?

तुमचे वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुमचे उत्पन्न कलम ४४एडी, ४४एडीए किंवा ४४एडीई मध्ये गणना केल्यानुसार व्यवसाय आणि व्यवसायातून असेल, तर तुम्हाला आयटीआर फॉर्म-१ भरण्याची गरज नाही. तुम्हाला आयटीआर फॉर्म-४ निवडून तुमचा आयटीआर फाइल करावा लागेल.

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

ई-फायलिंग पोर्टलवर आयटीआर दाखल करण्यासाठी, तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म १६, बँक खात्याचे तपशील, गुंतवणुकीचे तपशील आणि पुरावे आणि इतर उत्पन्नाचे पुरावे असणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन आणि आधार लिंक करणेही आवश्यक आहे. करदात्याचा ई-मेल आयडी देखील आयकर विभागाकडे नोंदणीकृत असावा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Income tax return what documents are required to file itr for assessment year 2022 23 find out pvp

ताज्या बातम्या