वृत्तसंस्था, नवी दिल्ली : आघाडीची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) मुदत ठेवींवरील व्याजदरात चालू महिन्यात दुसऱ्यांदा वाढ केली आहे. ताजी वाढ ही दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात करण्यात आली असून सुधारित व्याजदर बुधवार, २६ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. 

पीएनबी संकेतस्थळावर दिल्या गेलेल्या माहितीनुसार, ४६ दिवस ते ९० दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ७५ आधार बिंदू अर्थात पाऊण टक्क्यांनी वाढला आहे. तो आता ३.७५ टक्क्यांवरून ४.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे १८० दिवसांच्या एका वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवर ५ टक्क्यांऐवजी ५.५ टक्के व्याज मिळेल. एक वर्षांपासून ५९९ दिवसांपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदर ६० आधार बिंदूंनी वाढत तो ६.३० टक्के झाला आहे.

ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्येष्ठ नागरिकांना सामान्य दरापेक्षा ५० आधार बिंदू म्हणजेच अर्धा टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. त्यांना विविध कालावधीच्या ठेवींवर ४ टक्के ते ७.५० टक्के व्याज मिळेल. तर अति ज्येष्ठ नागरिकांना विविध कालावधीच्या ठेवींवर ४.३० ते ७.८० टक्के दराने व्याज मिळेल.