स्पोर्ट युटिलिटी वाहन श्रेणीतील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राने तिच्या याच गटातील २,३०० वाहने माघारी बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. मेमध्ये तयार करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ, एक्सयूव्ही ५०० व झायलो या वाहनांमधील इंजिनातील सदोष व्हॅक्युम पम्पमुळे त्या परत घेण्यात येणार आहेत. यातील रचना खरेदीदारांना मोफत बदलून देण्याची तयारीही दाखविण्यात आली आहे. कंपनीने यापूर्वी जुलै २०१४ मध्ये याच श्रेणीतील स्कॉर्पिओ हे वाहन २३ हजारांच्या संख्येने परत बोलाविले होते.