मायक्रोमॅक्स मोबाइल उत्पादक भारतीय कंपनीच्या अध्यक्षपदाचा संजय कपूर यांनी राजीनामा दिला आहे. भारती एअरटेल या मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीत यशस्वी कारकीर्द घडविणाऱ्या कपूर हे मायक्रोमॅक्समधून दोन वर्षांतच बाहेर पडले आहेत.
कपूर यांनी का राजीनामा दिला हे स्पष्ट होऊ शकले नाही; त्याचबरोबर त्यांच्या पुढील कारकीर्दीबाबतही कंपनी अनभिज्ञ आहे, असे मायक्रोमॅक्सच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला सांगितले. भारती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेल्या कपूर यांनी जून २०१४ मध्ये मायक्रोमॅक्सची सूत्रे हाती घेतली होती. मायक्रोमॅक्सला जागतिक उत्पादन बनवण्यात त्यांचा वाटा होता. त्यांच्याच काळात मायक्रोमॅक्सने भारतीय बाजारपेठेत वरचष्मा राखला. भारतात फीचर फोनचा खप कमी होत असताना स्मार्टफोनचा खप वाढण्यामध्ये मायक्रोमॅक्सला संधी मिळाली होती. भारतीय बाजारपेठेत मोबाइल हँडसेट्सची विक्री जूनमध्ये सहा टक्क्य़ांनी कमी झाली. सॅमसंगचा या बाजारात २३ टक्के, मायक्रोमॅक्स १७ टक्के, इंटेक्स ११ टक्के, लावा ७ टक्के, लिनोवाचा ६ टक्के वाटा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Aug 2015 रोजी प्रकाशित
मायक्रोमॅक्सचे संजय कपूर यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा
मायक्रोमॅक्स मोबाइल उत्पादक भारतीय कंपनीच्या अध्यक्षपदाचा संजय कपूर यांनी राजीनामा दिला आहे.
First published on: 29-08-2015 at 06:38 IST
TOPICSमायक्रोमॅक्स
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Micromax chairman sanjay kapoor resigns