अनेकानेक विश्लेषकांच्या अनुमानांवर विसंबून तुम्ही जर आगामी दोन वर्षांत शेअर बाजारात प्रचंड तेजीची आस लावून बसला असाल तर थोडे सबुरीने घ्या, असे बजावणाराही एक कल आहे. ग्रहताऱ्यांच्या आधारे शेअर बाजारविषयक पूर्वानुमान करणारे सॉफ्टवेअर प्रस्तुत झाले असून, पुढील दोन वर्षे बाजाराला अच्छे दिन दिसण्यासाठी ग्रहांची साथ नसल्याचे त्याचे विश्लेषणाअंती अनुमान आहे.
भांडवली बाजार, रुपयाचा विनिमय दर, सोने-चांदीची चमक, हवामान वगैरे पैसा गुंतवणूकविषयक कल ज्योतिषाच्या माध्यमातून पडताळणाऱ्यांची एक दिवसाची परिषद रविवारी मुंबईत हॉटेल सहारा स्टार येथे योजण्यात आली. ‘ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अॅस्ट्रोलॉजर्स सोसायटी’द्वारे आयोजित या परिषदेत या अभिनव सॉफ्टवेअरचे अनावरण करण्यात आले. परिषदेचे आयोजक जयंत पांडे यांच्या मते, ग्रहताऱ्यांच्या दशेवर आधारित हे बाजार भाकितांची विश्वासार्हता ८० टक्के इतकी आहे. देश-विदेशातून ४०० हून अधिक प्रतिनिधीं परिषदेला उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2016 रोजी प्रकाशित
पुढील दोन वर्षे बाजारात अच्छे दिनांचे ‘ग्रह’ नाहीत!
ग्रहताऱ्यांच्या आधारे शेअर बाजारविषयक पूर्वानुमान करणारे सॉफ्टवेअर प्रस्तुत झाले
Written by लोकसत्ता टीम
First published on: 26-01-2016 at 03:01 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No acche din for market at least in next two years