मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अर्थात मुंबै बँकेच्या संचालक मंडळावर मुंबई सहकारी बोर्डाच्या प्रतिनिधी म्हणून पद्मावती मनोहर शिंदे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई सहकारी बोर्डाच्या व्यवस्थापक समितीच्या अलीकडेच अध्यक्ष कृष्णा शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मुंबै बँकेच्या संचालक मंडळावर पद्मावती शिंदे यांना पाठविण्याचा निर्णय करण्यात आला.
पद्मावती शिंदे या १९९३ पासून कुर्ला नागरिक सहकारी बँकेवर संचालिका म्हणून कार्यरत असून, १९९८-९९ मध्ये त्यांनी या बँकेचे अध्यक्षपदही भूषविले. शिवाय मुंबई सहकारी बोर्डाच्या संचालिका म्हणून १९९६-९७ ते २०००-२००१ अशी त्यांची कारकीर्द असून, २०१२-१३ पासून त्या पुन्हा बोर्डाच्या संचालक मंडळावर निवडून आल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2013 रोजी प्रकाशित
मुंबै बँकेच्या संचालक मंडळावर पद्मावती शिंदे
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अर्थात मुंबै बँकेच्या संचालक मंडळावर मुंबई सहकारी बोर्डाच्या प्रतिनिधी म्हणून पद्मावती मनोहर शिंदे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. मुंबई सहकारी बोर्डाच्या व्यवस्थापक समितीच्या अलीकडेच अध्यक्ष कृष्णा शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मुंबै बँकेच्या संचालक मंडळावर पद्मावती शिंदे यांना पाठविण्याचा निर्णय करण्यात आला.
First published on: 24-01-2013 at 12:22 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padmavati shinde on board director of mumbrai bank