‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’च्या विक्रमी १८,३०० कोटी रुपयांच्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) एका आठवड्यामध्येच कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल २६ टक्क्यांनी पडलीय. यामुळे लहान-मोठ्या सर्वच गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. शॉर्ट टर्मसाठी या शेअर्सच्या माध्यमातून पैसे कमवण्याच्या उद्देशाने गुंतवणूक करणाऱ्या अनेक छोट्या गुंतवणूकदारांची यामुळे मोठी निराशा झालीय.

हे फोटो पाहून थक्क व्हाल >> महिना १० हजार पगारामुळे लग्न रखडलेला तरुण ते १७ हजार कोटींचा मालक; Paytm च्या सीईओंचा प्रेरणादायी प्रवास

नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये आज पेटीएमचा शेअर १,९५० रुपयांना एक या प्रमाणे ट्रेड करत होता. शेअर्स इश्यू करण्यात आले त्यापेक्षा ही रक्कम ९.३ टक्क्यांनी घसरलीय. आयपीओच्या माध्यमातून शेअर्सची विक्री झाली तेव्हा प्रत्येक शेअर २१५० रुपयांना विकला गेला होता. आजच्या व्यवहारांमध्ये शेअर्सच्या किंमतीत आणखीन पडझड होऊन इंट्रा डे लो स्तरावर शेअर्स पोहचले तेव्हा एका शेअरची किंमत १ हजार ५८६ रुपये इतकी होती.

कंपनीने आयपीओच्या माध्यमातून तब्बल १८ हजार ३०० कोटींचं भांडवल उभं केलं. देशातील कोणत्याही कंपनीने आयपीओच्या माध्यमातून उभं केलेलं हे सर्वात मोठं भांडवल ठरलं. मागील आठवड्यामध्ये हे शेअर्स १.८९ टक्क्यांनी सबस्क्राइब झाले. बीएसईवर पेटीएमचे शेअर्स १९५५ ने ट्रेड होत होते. कंपनीच्या शेअर्सची किंमत पडली असली तरी कंपनीचं एकूण मूल्य १ लाख कोटींहून अधिक झालं आहे. सकाळी पावणे अकराच्या सुमारास कंपनीचे शेअर्स मूळ किंमतीपेक्षा २२ टक्के कमी म्हणजेच १ हजार ६७६ वर ट्रेड करत होते.

नक्की वाचा >> राष्ट्रगीत वाजू लागलं अन् Paytm चे CEO मंचावरच रडू लागले; डोळे पुसत म्हणाले, “भारत भाग्य विधाता हे शब्द…”

आपल्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणात शेअर्सची किंमत पडण्यामागील मुख्य कारण शेअर्सची किंमत अधिक असणे हे असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय. मॅक्वेरि रिसर्चमधील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पेटीएमच्या शेअर्ससंदर्भात कंपनीने पूर्ण लक्ष्य देऊन आणि नियोजनपूर्व पद्धतीने काम केलं नसल्याचं म्हटलं आहे. नफ्यामध्ये राहून फार मोठी उडी मारणं हे फार मोठं आव्हान असून कंपनीची चर्चा फार जास्त आहे, असंही सांगण्यात आलंय.

कंपनीने आता ८३०० कोटींचे शेअर्स इश्यू केले आहेत. तसेच यामध्ये ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून १० हजार कोटी रुपये गुंतवणूकदारांनी गुंतवलेत. कंपनीने १०० हून अधिक संस्थात्मक गुंतवणूकदारांना ८२३५ कोटींचे शेअर्स विकले आहेत. या संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये सिंगापूर सरकारचाही समावेश आहे. पेटीएमचे शेअर्स घेण्यामध्ये एकूण १२२ संस्थात्मक गुंतवणूकदारांनी रस दाखवला. त्यांनी ३.८३ कोटी शेअर्स विकत घेतले. ३ नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार यावेळी एका शेअरची किंमत २ हजार १५० रुपये होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार पेटीएमच्या शेअर्समुळे कंपनीचे मालक विजय शर्मा यांना मोठा फायदा झाला आहे. त्यांची एकूण संपत्ती २.४ बिलियन डॉलर्सवर पोहचली आहे. या आयपीओमुळे कंपनीशी संबंधित अनेकजण कोट्याधीश झाले आहेत.