ठाणे-बेलापूर पट्टय़ात गेल्या अर्धशतकापासून असलेला फायझर कंपनीचा औषधनिर्माण प्रकल्प अखेर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १९६० च्या दशकात हा प्रकल्प अस्तित्वात आला होता.
या प्रकल्पात २०१३ पासूनच औषध उत्पादन बंद करण्यात आले होते. आता १६ सप्टेंबरपासून हा प्रकल्प पूर्णत: बंद असेल, असे कंपनीने बुधवारी मुंबई शेअर बाजाराला कळविले. कंपनीने येथील कामगारांना गेल्या वर्षीच स्वेच्छानिवृत्ती जारी केली. तेथील २१२ पैकी १३२ कामगारांनी याचा लाभ घेतल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. उर्वरित कामगारांना प्रकल्प बंद असला तरी पूर्ण वेतन मिळणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jul 2015 रोजी प्रकाशित
‘फायझर’चा नवी मुंबईतील प्रकल्प अखेर बंद
ठाणे-बेलापूर पट्टय़ात गेल्या अर्धशतकापासून असलेला फायझर कंपनीचा औषधनिर्माण प्रकल्प अखेर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
First published on: 16-07-2015 at 12:01 IST
TOPICSप्रोजेक्ट
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phyzer navi mumbai project finally closed