PPF Vs NPS: नोकरी करत असताना प्रत्येकाला निवृत्तीनंतरच्या खर्चाची चिंता असते. कारण सेवानिवृत्तीनंतर उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते आणि फक्त तुमची बचत दैनंदिन खर्च भागवण्यासाठी वापरली जाते. लोकांची ही गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने सेवानिवृत्तीसाठी गुंतवणुकीच्या दोन योजना सुरू केल्या आहेत. जे सार्वजनिक पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) आणि नॅशनल पेन्शन सिस्टम(NPS) आहे. बर्‍याच वेळा लोकांना या योजनांचे संपूर्ण तपशील माहित नसतात, ज्यामुळे ते स्वतःसाठी अधिक चांगला पर्याय निवडू शकत नाहीत. म्हणूनच योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

पब्लिक प्रोविडेंट फंड

पीपीएफ खात्यात दरवर्षी किमान ५०० आणि कमाल १.५० लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. यामध्ये गुंतवलेल्या रकमेवर आयकर कलम ८०C प्रमाणे टॅक्स मध्ये डिडक्शन मिळते. त्याच वेळी, पीपीएफ खात्यातील मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षे आहे, जी ५ वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच, पैशांची गरज भासल्यास PPF खात्यातून ७ वर्षांनंतर प्री-मॅच्युअर पैसे काढता येतात. PPF खात्यात केलेल्या गुंतवणुकीवर ७.१ टक्के व्याज मिळते. अशा परिस्थितीत, निवृत्तीसाठी निधी जोडण्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.

MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
national pension scheme marathi news
मार्ग सुबत्तेचा : राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस): फायदे आणि तोटे
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

नॅशनल पेन्शन सिस्टम

नॅशनल पेन्शन सिस्टमची रचना निवृत्तीनंतर उत्पन्नाचा स्रोत म्हणून केली आहे. १८-७० वयोगटातील कोणीही या योजनेत गुंतवणूक करू शकतो. NPS मध्ये जमा केलेली रक्कम गुंतवण्याची जबाबदारी PFRDA द्वारे नोंदणीकृत पेन्शन फंड व्यवस्थापकांना दिली जाते. ते तुमची गुंतवणूक इक्विटी, सरकारी रोखे आणि गैर-सरकारी रोख्यांमध्ये निश्चित उत्पन्न साधनांव्यतिरिक्त गुंतवतात.

NPS अंतर्गत, आयकर कायद्याच्या कलम ८०CCD(१B) अंतर्गत, ५० हजार रुपयापर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ उपलब्ध आहे. जर तुम्ही कलम ८०C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतची मर्यादा पूर्ण केली असेल तर NPS तुम्हाला अतिरिक्त कर बचतीमध्ये देखील मदत करू शकते. या योजनेच्या मुदतपूर्तीवर ६० टक्के रक्कम काढण्यावर कोणताही कर नाही.

NPS, PPF मधील मूलभूत फरक

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी NPS योजना उत्तम आहे आणि अल्प मुदतीच्या गुंतवणुकीसाठी PPF हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला निश्चित परतावा हवा असेल तर तुम्ही पीपीएफमध्ये पैसे जमा करू शकता. तर NPS मध्ये तुमचा परतावा शेअर बाजारावर अवलंबून असतो.