मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार प्रवीण दरेकर यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश पांडुरंग शिरवाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुंबई शहराचे उपजिल्हाधिकारी संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत आमदार दरेकर व शिरवाडकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. १९९९ पासून दरेकर बँकेच्या संचालक मंडळावर असून त्यांनी तीनवेळा बँकेचे अध्यक्षपद भूषवले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jun 2013 रोजी प्रकाशित
मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रवीण दरेकर
मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार प्रवीण दरेकर यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश पांडुरंग शिरवाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुंबई शहराचे उपजिल्हाधिकारी संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत आमदार दरेकर व शिरवाडकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
First published on: 06-06-2013 at 12:22 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin darekar honors as a chairman of mumbai bank again