वाहनांची इंधन कार्यक्षमता (माइलेज) वाजवीपेक्षा फुगवून सांगणाऱ्या घोटाळ्याची कबुली देणाऱ्या जपानी वाहन निर्मात्या मित्सुबिशी मोटर्सच्या ३४ टक्के भागभांडवलाच्या संपादनासह कंपनीचा ताबा मिळविण्याचा करार निस्सान या दुसऱ्या बडय़ा जपानी कंपनीने गुरुवारी केला. निस्सान मोटर कं.चे अध्यक्ष व मुख्याधिकारी कालरेस घोस्न यांनीमित्सुबिशीचे अध्यक्ष ओसामू मोसुको यांनी निस्सानच्या योकोहामा येथील मुख्यालयात संयुक्त पत्रकार परिषदेत अधिकृतपणे हे जाहीर केले. कंपनीवर मालकीसह अनेक मुद्दय़ांसंबंधाने उभयतांमध्ये वाटाघाटी सुरू असून, सुमारे १.८ अब्ज अमेरिकी डॉलरच्या मोबदल्यात, निस्सानने कंपनीचा बहुतांश भांडवली हिस्सा मिळविल्याचे सांगण्यात येत आहे. मित्सुबिशी आणि निस्सान यांच्या दरम्यान आधीपासून अनेकांगी भागीदारी सुरू होती. ताज्या व्यवहारानंतर मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजचा हिस्सा २० टक्क्यांवर सीमित राहील.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2016 रोजी प्रकाशित
घोटाळेग्रस्त ‘मित्सुबिशी’चा ताबा ‘निस्सान’कडे!
ताज्या व्यवहारानंतर मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजचा हिस्सा २० टक्क्यांवर सीमित राहील.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 13-05-2016 at 12:38 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restoring image growth at mitsubishi biggest challenge says nissan motor ceo