रशिया युक्रेन युद्धाचा आज १२ वा दिवस आहे. या युद्धाचे परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थेवर होत आहे. याचे परिणाम शेअर बाजारात दिसून येत आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली आहे. सकाळच्या सत्रात बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये १६५० आणि निफ्टीत ४५० अंकांची घसरण झाली आहे. आशिया बाजारात शेअर्सची विक्री आणि कच्चा तेलाच्या वाढत्या किमती पाहता शेअर बाजारात पडझडीची मालिका सुरु आहे. सेन्सेक्स ५३००० हजारांच्या खाली गेला असून निफ्टीही १६ हजाराच्या खाली गेला आहे.

हिंदाल्को २.६७ टक्क्यांनी वाढून ५९९ रुपयांवर, कोल इंडिया १.९३ टक्क्यांनी वाढून १८४ रुपयांवर, ओएनजीसी १.७२ टक्क्यांनी वाढून १६८ रुपयांवर आणि टाटा स्टील १.६१ टक्क्यांनी वाढून १२९७ रुपयांवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, मारुती सुझुकी ६.२७ टक्के, बजाज फायनान्स ५.४२, आयसीआयसीआय बँक ५.१४ टक्के, लार्सन ४.७० टक्के, टाटा मोटर्स ४.०५ टक्के, अॅक्सिस बँक ३.९७ टक्के, बजाज फिनसर्व्ह ३.९२ टक्के घसरणीसह व्यवहार करत आहेत.

Russia Ukraine War Live: पंतप्रधान मोदी आज पुतिन यांच्याशी फोनवर बोलणार

बाजारातील घसरणीमुळे, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPI) भारतातील आत्मविश्वासही कमी होताना दिसत आहे. एफपीआयची बाजारात सातत्याने विक्री होत आहे. एफपीआयने ऑक्टोबरपासून शेअर बाजारात २ लाख कोटींहून अधिकची विक्री केली आहे. एफपीआयकडून डॉलरची मागणी वाढल्याने रुपयाही दबावाखाली आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने ७६.७७ रुपयांची नीचांकी पातळी गाठली आहे. मार्चबद्दल बोलायचे तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणूकदारांनी गेल्या तीन ट्रेडींग सत्रांमध्ये १८,६१४ कोटी रुपयांची विक्री केली आहे. एफपीआयची विक्री, महागलेले कच्चे तेल आणि युक्रेन युद्ध यामुळे गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात घसरण झाली आहे. एनएसईचा मुख्य निर्देशांक निफ्टीने १९ ऑक्टोबर २०२१ रोजी १८,६०४ अंकांची सर्वोच्च पातळी गाठली होती. त्यानंतर बाजार १३ टक्क्यांनी घसरला आहे.

टाकी आजच फूल करा; पेट्रोल- डिझेल १५ ते २० रुपयांनी महाग होऊ शकतं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, इन्व्हेस्टमेंट बँकर मॉर्गन स्टॅन्ले यांच्या अहवालानुसार, कच्च्या तेलाच्या किमतीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने चालू वित्तीय तूट ७५ बेस पॉइंट्स किंवा ०.७५ टक्क्यांनी वाढू शकते. याशिवाय, महागाई १०० बेस पॉइंट्स किंवा १ टक्क्यांनी वाढू शकते. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्व केंद्रीय बँका एकापाठोपाठ एक व्याजदर वाढवण्याच्या घोषणा करत आहेत, त्यामुळे शेअर बाजारातील लिक्विडिटी कमी होण्याचा धोका आहे. यूएस फेडरल रिझर्व्ह बँकेचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी सांगितले की, १५ ते १६ मार्चपर्यंत व्याजदर ०.५ टक्क्यांनी वाढू शकतो.