भिलवाडास्थित संगम समूहाने आपल्या महालक्ष्मी टीएमटी प्रा. लि. या समूहातील कंपनीच्या पोलाद प्रकल्पात ५०० कोटी रुपये गुंतविल्याची घोषणा केली आहे. या नव्या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च ६५० कोटी रुपये असेल असा समूहाचा अंदाज आहे. बांधकाम उद्योगात वापरात येणाऱ्या टीएमटी बारच्या निर्मितीसाठी महालक्ष्मी टीएमटीने अत्याधुनिक स्लिट रोलिंग तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. महाराष्ट्रातील वध्र्याजवळ देवळी औद्योगिक वसाहतीत हा एकात्मिक पोलाद प्रकल्प कंपनीने उभारला आहे. शिवाय निम्न श्रेणीच्या लोहखनिजापासून स्पंज आयर्न तयार करण्यासाठी बॅकवर्ड इंटिग्रेशन प्रकल्पही महालक्ष्मीकडून राबविला जात आहे. संपूर्ण प्रकल्प कार्यरत झाल्यास महालक्ष्मी टीएमटीची उत्पादन क्षमता वार्षिक पाच लाख टन टीएमटी बार, अँगल्स आणि चॅनल्स अशी वधारेल.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2013 रोजी प्रकाशित
संगम समूहाची पोलाद प्रकल्पात ५०० कोटींची गुंतवणूक
भिलवाडास्थित संगम समूहाने आपल्या महालक्ष्मी टीएमटी प्रा. लि. या समूहातील कंपनीच्या पोलाद प्रकल्पात ५०० कोटी रुपये गुंतविल्याची घोषणा केली आहे. या नव्या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च ६५० कोटी रुपये असेल असा समूहाचा अंदाज आहे.
First published on: 06-03-2013 at 12:16 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangam group invest rs 500 crore in steel