युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. पाश्चिमात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. क्रीडा, ऑटो, मोबाईल कंपन्यांनी रशियातून आपला काढता पाय घेतला आहे. अशा स्थितीत भारतानेही रशियातील व्यवहार सध्या थांबवले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या युद्धाच्या दरम्यान उद्भवलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. भारतातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि बँक कॅनरा बँकेचा रशियात ज्वाइंट वेंचर आहे. असं असलं तरी युद्धक्षेत्रात भारतीय बँकांची कोणतीही उपकंपनी, शाखा किंवा प्रतिनिधी नाही. रशियामध्ये सक्रिय असलेली भारतीची एकमेव बँकिंग संस्था आहे. SBI आणि कॅनरा बँकेच्या संयुक्त उपक्रमाचे नाव ‘कमर्शियल इंडो बँक LLC’ आहे. या बँकेत एसबीआयचा ६० टक्के तर कॅनरा बँकेचा ४० टक्के हिस्सा आहे. इतर देशांमध्ये भारतीय बँकांच्या डझनभर उपकंपन्या आहेत. परंतु या कंपन्या यूके, कॅनडा, यूएसए आणि केनिया, टांझानिया आणि भूतान सारख्या देशांमध्ये आहेत. म्हणजेच, रशियामध्ये भारताची उपकंपनी नसल्यामुळे, कमर्शियल इंडो बँक एलएलसी हा एकमेव उपक्रम आहे.
भारतीय बँकेने हे स्पष्ट केले आहे की ते आंतरराष्ट्रीय निर्बंधाखालील रशियन संस्थांसोबत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करणार नाहीत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एसबीआयने आपल्या काही ग्राहकांना पत्र पाठवून माहिती दिली आहे की, यूएस, युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिबंध यादीमध्ये समाविष्ट असलेल्या बँका, बंदरे आणि जहाजांशी त्यांनी कोणताही व्यवहार करणार नाही.
३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत भारतीय बँकांच्या इतर देशांमध्ये एकूण १२४ शाखा आहेत. यूएईमध्ये १७, सिंगापूरमध्ये १३, हाँगकाँगमध्ये ९ आणि यूएसए, मॉरिशस आणि फिजी बेटांमध्ये प्रत्येकी ८ शाखा आहेत. रशियामध्ये भारतीय बँकांचे कोणतेही प्रतिनिधी कार्यालय नाही. तर UAE, UK आणि Hong Kong सारख्या देशांमध्ये भारताची ३८ प्रतिनिधी कार्यालये आहेत.