ई-कॉमर्स व्यासपीठाबरोबरची भागीदारी विस्तारित करताना स्टेट बँकेने गुरुवारी स्नॅपडीबरोबरही करार केला. याबाबतच्या करारावर कोलकाता येथे बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य व स्नॅपडिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल बहल यांनी स्वाक्षरी केली.
लघु व मध्यम उद्योजकांना त्यांची उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी तसेच कमी व्याजदरांमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्नॅपडीलबरोबरच स्टेट बँकेने पेपल या डिजिटल पेमेन्ट सुविधा देणाऱ्या कंपनीबरोबरही गुरुवारी करार केला. पेपलचे भारतातील व्यवस्थापक विक्रम नारायण हेही या वेळी उपस्थित होते.
स्टेट बँकेने बुधवारी मुंबईत अशाच प्रकारचा एक करार अॅमेझॉनबरोबर केला.
संग्रहित लेख, दिनांक 22nd May 2015 रोजी प्रकाशित
स्टेट बँक – स्नॅपडील, पेपलदरम्यान करार
ई-कॉमर्स व्यासपीठाबरोबरची भागीदारी विस्तारित करताना स्टेट बँकेने गुरुवारी स्नॅपडीबरोबरही करार केला.

First published on: 22-05-2015 at 03:07 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi ties up with snapdeal paypal