सप्ताहारंभीच्या सत्रातील अस्थिरता संपुष्टात आणताना प्रमुख भांडवली बाजार निर्देशांक सोमवारी महिन्याच्या किमान स्तरावर विसावले. ६५.५९ अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,४३७.७१ वर तर निफ्टी १४.६० अंश घसरणीमुळे ८,६३३.१५ वर स्थिरावला. सलग दुसऱ्या सत्रातील घसरणीमुळे प्रमुख निर्देशांक त्यांच्या महिन्यातील नव्या तळात विसावले आहेत.
चालू आठवडय़ातच अमेरिकी फेडरल रिझव्र्ह बँकेची व्याजदर भूमिका आणि येत्या महिन्यातील रिझव्र्ह बँकेचे पतधोरण यावर गुंतवणूकदारांची नजर आहे. फेब्रुवारीतील किरकोळ महागाई दर किंचित वर (५.३७%) गेला असतानाच याच महिन्यातील घाऊक महागाई निर्देशांकाने मात्र पुन्हा उणे (-२.०६%) प्रवास नोंदविला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Mar 2015 रोजी प्रकाशित
सप्ताहारंभ नफेखोरीने
सप्ताहारंभीच्या सत्रातील अस्थिरता संपुष्टात आणताना प्रमुख भांडवली बाजार निर्देशांक सोमवारी महिन्याच्या किमान स्तरावर विसावले.
First published on: 17-03-2015 at 07:29 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex falls by 65 59 points