भांडवली बाजारात गुरुवारी वध-घटीच्या हिंदोळ्यानंतर निर्देशांकांनी मोठी आपटी नोंदविली. २२९.०९ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,६०२.०१ वर तर ६२.७५ अंश आपटीने निफ्टी ८,२९२.९० वर येऊन ठेपला. दोन्ही e04निर्देशांकाचा हा गेल्या दीड महिन्यांचा तळ असून, ३० ऑक्टोबरनंतरची निर्देशांकांची ही किमान पातळी आहे. कच्च्या तेलातील नरमाईने रिलायन्स इंडस्ट्रिज, ओएनजीसी या समभागांमध्ये नफेखोरी झाली.
रुपयाची ३१ पैशांनी आपटी
मुंबई: डॉलरसमोर स्थानिक चलनाची घसरण रुंदावली असून गुरुवारी तर रुपयाने तब्बल ३१ पैशांची आपटी नोंदविली. यामुळे चलन ६२च्या खाली, थेट ६२.३३वर घसरले. त्याचा हा १० महिन्यांतील नीचांक स्तर आहे.