फियाट ग्रुप अॅटोमोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने पुण्यात चिंचवड येथे स्वतंत्र डीलरशीपचे उद्घाटन करण्यात आले. स्काय मोटोचे शोरूम हे ‘स्काय मोटो’ डी-२, केएसबी चौक, चिंचवड येथे असून कार्यशाळा उत्पादन केंद्र ज्ञानेश्वर चौक आकुर्डीत आहे. हे शोरूम ११ हजार चौरस फूट जागेवर असून पाच गाडय़ा प्रदर्शनार्थ ठेवण्यात आल्या आहेत. या डीलरशिपमुळे ‘लिनिया, पुंटो’ या दोन मॉडेल्सचे रिटेलिंग करण्याबरोबरच आगामी वर्षांत काही मॉडेल्स भारतात येणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी स्काय मोटोचे संचालक व खासदार गजानन बाबर, विवेक सावंत आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना फियाट क्रसिलर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक नागेश बसवनहल्ली म्हणाले,की फियाट इंडिया पुण्याकडे संरचनात्मक बाजारपेठ म्हणून पाहते. स्काय मोटोशी केलेल्या भागीदारीमुळे ग्राहक मिळण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली जाते. भारतातील बाजार व्याप्ती वाढवण्यासाठी फियाट प्रयत्न करत असून हा कार्यक्रम त्या विस्ताराचा भाग आहे. स्काय मोटोचे व्यवस्थापकीय संचालक इंद्रजित देसाई म्हणाले की, संपूर्ण भारतात फियाटच्या गाडय़ा त्यांचे डिझाईन व अभियांत्रिकी कामांसाठी प्रसिद्ध आहे.
‘गोदरेज इंटिरिओ’तर्फे घररचना बदलण्यासाठी स्पर्धा
पुणे : घराच्या त्याच-त्या रचनेचा कंटाळा आला असल्यास ‘इंटिरिअर’ मोफत बदलून घेण्याची एक संधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे. ‘गोदरेज इंटिरिओ’तर्फे ‘अपलोड अँड ट्रान्सफॉर्म’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेच्या विजेत्यांना घराच्या एखाद्या भागाची रचना मोफत बदलून मिळणार असल्याचे कंपनीतर्फे कळवण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी घराच्या ज्या भागाचे इंटिरिअर आपल्याला बदलायचे आहे त्या भागाचे छायाचित्र काढून गोदरेज इंटिरिओच्या संकेतस्थळावर किंवा कंपनीच्या फेसबुक पानावर अपलोड करायचे आहे. छायाचित्राबरोबर इंटिरिअर बदलण्याचे रंजक कारणही नमूद करायचे आहे. विजेत्या स्पर्धकांना घर सजवण्यासाठी नवीन फर्निचर, भिंतीवर लावायची चित्रे आणि इतर अॅक्सेसरीज् कंपनीतर्फे भेट दिल्या जाणार आहेत.
‘कोलते- पाटील डेव्हलपर्स’च्या नफ्यात ११५ टक्क्य़ांची वाढ
पुणे : कोलते – पाटील डेव्हलपर्स या कंपनीच्या निव्वळ नफ्यात चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत ११५ टक्क्य़ांची वाढ होऊन हा नफा २६.४० कोटी रुपये झाला आहे. तर कंपनीच्या महसुलात ११२ टक्क्य़ांची वाढ होऊन तो २१९.४३ कोटी रुपये झाल्याचे कंपनीने कळवले आहे. कंपनीच्या ‘इबीआयटीडीए’मध्येही (अर्निग्ज बीफोर इंट्रेस्ट, टॅक्सेस, डेप्रिसिएशन) ११२ टक्क्य़ांची वाढ होऊन तो ६६.६९ कोटी रुपये झाला आहे. या आर्थिक वर्षांत मुंबईच्या बाजारपेठेत प्रवेश करून काही नवीन प्रकल्प आणणार असल्याचे कंपनीतर्फे कळवण्यात आले आहे.
‘सीएफओ ऑफ द इयर’ पुरस्कार सुरेश घोटगे यांना
पुणे : ‘स्टार्स ऑफ द इंडस्ट्री ग्रुप’ आणि ‘एशियन कॉन्फेडरेशन ऑफ बिझिनेसेस’तर्फे ‘अॅटलास कॉप्को’ कंपनीचे प्रमुख वित्त अधिकारी सुरेश घोटगे यांना ‘सीएफओ ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्डस्- २०१३’ सोहळ्यात घोटगे यांना पुरस्कार देण्यात आला. घोटगे चार्टर्ड अकाऊंटंट असून अकाऊंटिंग, फायनान्स, टॅक्सेशन तसेच लीगल व कॉर्पोरेट व्यवस्थापन या विषयांतील अनुभव आहे.
* सेन्सेक्स : नव्या आठवडय़ाची सुरुवात करतानाही प्रमुख भांडवली बाजार सकारात्मक स्थितीतच राहिला. सलग दुसऱ्या सत्रात सावरताना मुंबई निर्देशांक १५७.६४ अंश वाढीसह १८,९४६.९८ अशा १९ हजारानजीक पोहोचला.
* रुपया : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण नव्या सप्ताहारंभीदेखील कायम आहे. चलन सोमवारी ३९ पैशांनी कमकुवत बनले. दिवसअखेर ते ६१.२७ वर स्थिरावले. चलन अवमूल्यन रोखण्यासाठी उपाययोजना करूनही रुपया ६१ च्या तळातून बाहेर येत नाहीय.
* सोने-चांदी : भांडवली बाजार सुधारत असताना सराफा बाजारातील मौल्यवान धातूंचे दरही तेजीकडे वळत आहे. आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी त्यात भरीव वाढ पहायला मिळाली. गेल्या सप्ताहात २९ हजाराच्या आत असणारे सोने सोमवारी तोळ्यासाठी हा टप्पा पार करते झाले. शहरात स्टॅण्डर्ड सोन्याचा तोळ्याचा भाव २९,२५० रुपये झाला. तर चांदीच्या रुपातील पांढरा धातुच्या दरातील चकमही चांगलीच तेजाळली आहे. किलोचा चांदीचा भाव एकदम ४३ हजारांवरून थेट ४५ हजार रुपयांपुढे गेला.
संग्रहित लेख, दिनांक 13th Aug 2013 रोजी प्रकाशित
संक्षिप्त-वृत्त : ‘फियाट’ चे चिंचवड येथे नवे विक्री दालन
फियाट ग्रुप अॅटोमोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने पुण्यात चिंचवड येथे स्वतंत्र डीलरशीपचे उद्घाटन करण्यात आले.
First published on: 13-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shorts business finance news