टाटा हाऊसिंगने भारतात पहिल्यांदाच फेसबुकद्वारे घरविक्रीची घोषणा केली आहे. यानुसार कंपनी तिच्या गोव्यातील गोवा पॅराडाईज प्रकल्पातील घरे या माध्यमावर उपलब्ध करून देत आहे. प्रकल्प सुरु होण्यापूर्वी त्यामध्ये घरांचे बुकींग करण्यासाठी प्रस्तावित खरेदीदारांना फेसबूकवर नावनोंदणी करावी लागेल. यानंतर त्यांना एकमेव आमंत्रित कोड मिळेल. हा एकमेव आमंत्रित कोड वापरुन मर्यादित घरांसाठी पहिल्यांदा येईल त्याला प्राध्यान्य या तत्वानुसार ग्राहकांना नोंदणी करता येईल. गोवा पॅराडाईज नावाचा हा प्रकल्प पाच एकर परिसरात असून निवासी घरांचा प्रकल्प आहे. त्यांच्या किंमती २९ लाख रुपयांपासून पुढे आहेत. प्रकल्पाचे स्थळ दाबोलीम येथे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2015 रोजी प्रकाशित
टाटा हाऊसिंगची ‘फेसबुक’वर घर विक्री
टाटा हाऊसिंगने भारतात पहिल्यांदाच फेसबुकद्वारे घरविक्रीची घोषणा केली आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 27-10-2015 at 07:49 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata housing plans to sell homes in goa through facebook