अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हने संभाव्य व्याजदर वाढ तूर्त लांबणीवर टाकण्याचे बुधवारी जाहीर केले. अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने असा निर्णय घेतला जाणार असल्याचेही बँकेने स्पष्ट केले. फेडरल रिझव्र्हचे पतधोरण सप्टेंबरच्या मध्यावर आहे. फेडने २००८-०९ पासून व्याजदर शून्यवत स्थिर ठेवले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दरवाढीचे अंदाज बांधले जात होते.
जपानच्या सरकारी बँकेच्या प्रमुखांनी चीनबाबत आशावाद व्यक्त केला. चीनची अर्थव्यवस्था वार्षिक ७ टक्के दराने प्रवास करेल, असे वक्तव्य त्यांनी केले.
सरकारकडून ठोस आर्थिक उपाययोजना होत असल्याचे मानून चीनमधील सर्वच प्रमुख भांडवली बाजारांत पुन्हा एकदा तेजीचे पडघम वाजू लागले. तेथे दोन महिन्यांतील सर्वोत्तम निर्देशांक झेप नोंदली गेली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Aug 2015 रोजी प्रकाशित
सर्वदूर तेजीची कारणे काय?
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हने संभाव्य व्याजदर वाढ तूर्त लांबणीवर टाकण्याचे बुधवारी जाहीर केले.
First published on: 28-08-2015 at 02:06 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the reason behind swing in market