सुमारे ४० वर्षांपूर्वी म्हणजे १९७३ मध्ये स्थापन झालेली कल्याणी स्टील्स लिमिटेड ही सुप्रसिद्ध कल्याणी समूहाची एक कंपनी आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवली असून, सध्या इंजिनीअिरग आणि फोìजगसाठी जागतिक दर्जाचे स्टील उत्पादन करणारी ती एक प्रमुख कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीची उत्पादने प्रामुख्याने वाहन आणि इंजिनीअिरग उद्योगांना पुरविली जातात. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथील प्रकल्पांतून उत्पादन घेणाऱ्या या कंपनीचे खाणकाम उद्योगही कर्नाटक राज्यात आहे. मार्च २०१४ अखेर समाप्त आíथक वर्षांसाठी कंपनीने उत्तम आíथक कामगिरी करून दाखवली आहे. विक्रीत ३९% वाढ होऊन ती १,११३.४ कोटींवर गेली आहे तर नक्तनफ्यातही १४५% दणदणीत वाढ होऊन तो ५८.६ कोटींवर गेला आहे. तसेच मार्च २०१४ तिमाहीतही कंपनीने विक्रीत ६७% वाढ साध्य करून नक्त नफ्यात १०७% वाढ केली आहे. येत्या दोन वर्षांत कंपनी आपल्या दोन्ही म्हणजे आंध्र प्रदेश तसेच कर्नाटक येथील प्रकल्पांच्या उत्पादन क्षमता वाढवीत आहे. जगातील इतर प्रगत देशांशी तुलना करता भारतातील माणशी स्टीलचा वापर फारच कमी आहे. त्यामुळेच येत्या काही वर्षांत स्टीलचे उत्पादन आणि उपभोग/ विनियोगही वाढेल अशी अपेक्षा आहे. गेली काही वर्षे उत्पादन क्षेत्रात मंदी असूनही कंपनीने चांगलीच प्रगती केल्याने येत्या दोन वर्षांत कंपनीकडून उत्कृष्ट कामगिरी अपेक्षित आहे. सध्या दहा पटींपेक्षा कमी किंमत/उत्पन्न (पी/ई) गुणोत्तर आणि १.२ बीटा असलेला हा शेअर तुम्हाला वर्षभरात किमान ३०% परतावा देऊ शकेल.