portfolioगेल्याच महिन्यांत बंगळुरू येथे एरो इंडिया २०१५ या दिमाखदार कार्यक्रमात एरो स्पेसमध्ये उत्कृष्ट निर्यातदार म्हणून पुरस्कार मिळालेली ही कंपनी पूर्वी इन्फोटेक
एन्टरप्राइज या नावाने ओळखली जात असे. १९९१ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने १९९७ मध्ये प्रतिस्पर्धी एसआरजी इन्फोटेक ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या १५ वर्षांत देशात आणि परदेशात अनेक कंपन्या ताब्यात घेतल्या. जगभरात सुमारे ३८ ठिकाणांहून कार्यरत असलेली ही कंपनी इंजिनिअिरग, डाटा अनॅलिटिक्स आणि नेटवर्क सोल्यूशन्स अशा विविध सेवांमध्ये कार्यरत आहे. सुमारे १२,५०० कर्मचारी असलेली ही कंपनी एरोस्पेस,वैद्यकीय, ऊर्जा, तेल आणि वायु, खाण उद्योग, दूरसंचार अशा अनेक क्षेत्रांतील कंपन्यांना सेवा पुरवते. कंपनीच्या एकूण उत्पन्नापकी सुमारे ५८% उत्पन्न अमेरिकेत पुरवलेल्या सेवांचे आहे. डिसेंबर २०१४ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ३२८.६० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७४.१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ५५% ने अधिक असून येत्या आíथक वर्षांतही कंपनी प्रगतीचा हा आलेख चढाच ठेवेल अशी अपेक्षा आहे. चार महिन्यांपूर्वी इन्वती इन्साइत्स या डाटा सायन्स कंपनीचा
ताबा घेतलेलली साएन्त ही एक मोठी रोकड बाळगणारी कंपनी आहे. कुठलेही कर्ज नसलेली, परदेशी गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांची भरपूर गुंतवणूक
असलेली ही मिड कॅप आॉफ्टवेअर कंपनी गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळवून देऊ शकेल.
 av-09
stocksandwealth@gmail.com