गेल्या वर्षभरात वस्त्रोद्योग क्षेत्रातील समभागांनी तुलनेने चांगला प्रवास केला आहे. मात्र अद्यापही ते त्याच्या उच्चांकांपासून लांब आहेत.
तयार वस्त्रप्रावरणे क्षेत्राने यान ते फॅब्रिक असा मोठा बदल गेल्या काही वषार्त पाहिला आहे. मात्र अद्यापही या क्षेत्राने योग्य तो परिमाण मिळविले आहे असे नाही. प्रत्यक्षात एक तृतियांशच लाभ प्रत्यक्षात सूत क्षेत्राला होत आहे, तर उर्वरित दोन-तृतियांश कमाई ही  बिगर कॉटन क्षेत्राशी निगडित क्षेत्रालाच होत आहे.
उदाहरणच द्यायचे झाल्यास समजा कॉटनपासून तयार करण्यात आलेला एक शर्ट ९०० रुपयांना मिळत असेल तर तर प्रत्यक्षात उत्पादकांना मात्र त्याचे केवळ ३०० रुपयेच मिळतात. उरलेले पस हे ते शर्ट घाऊक स्वरूपात घेणाऱ्या खरेदीदार व प्रत्यक्ष शर्ट विकणाऱ्या दुकानदारालाच मिळत असतात. सध्याच्या डॉलरच्या तुलनेतील रुपयाच्या अवमूल्यनाच्या कालावधीत तर वस्त्रोद्योग क्षेत्र संमिश्र प्रतिक्रिया नोंदवीत आहे.

अद्ययावत वस्त्रोद्योग क्षेत्रात तागासारखा कच्चा माल, पॉलिएस्टर, यार्न आणि शेवटी तयार कपडे असा साधारणत:   उत्पादन शृंखलेचा प्रवास असतो. घसरत्या रुपयामुळे परिणामी भक्कम होत असलेल्या परकीय चलनामुळे वस्त्र नियार्तदारांना चांगले वातावरण आहे. गेल्याच वषार्त या क्षेत्रातील तंत्रज्ञान अद्ययावततेसाठी ६.२५ लाख कोटी रुपयांचे आथिर्क सहाय्य मिळाले. सध्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या अनेक कंपन्यांचे समभाग हे त्यांच्या पुस्तकी मूल्यापेक्षाही कमी स्तरावर आहेत. या कंपन्यांनी अधिक लाभांश व वेतन देऊनही हे असे घडले आहे.
केवलकिरण क्लोिदगसारखी कंपनी पाहिली तर तिचा समभाग तुलनेने चांगला परतावा देत आहे. कंपनीने वित्तीय निष्कर्षही तसे फायद्यातील दिले आहेत. वस्त्रनिमिर्तीचा मोठा पसारा असणाऱ्या या कंपनीने नाममुद्रा अधिक बळकट करण्यासाठी तसेच विक्रीवर भर देण्यासाठी मोहिम आखली आहे. ही कंपनी आऊटसोर्स करून कपडे बनवून घेण्यावरही भर देते.
हे हेरूनच आनंद राठी सिक्युरिटीजसारख्या दलाल पेढय़ाही वधर्मान टेक्सटाईल, केपीआर मिल्ससारख्या कंपन्यांच्या समभागांची शिफारस करतात. आलोक इंडस्ट्रीज, आरएसडब्ल्यूएमसारख्या कंपन्यांच्या वाढत्या कर्जाबाबत मात्र चिंता आहे. वाढत्या व्याजदरामुळे या कंपन्यांच्या मिळकतीवर होणाऱ्या परिणामांमुळेही या कंपन्यांच्या समभागाकडे पाहणे महत्त्वपूर्ण ठरेल.