Shukra- Surya Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह आपापल्या वेगानुसार राशी परिवर्तन, नक्षत्र गोचर, मार्गी, वक्री, उदित, अस्त होत असतो. जेव्हा एखाद्या राशीत एकाहून अधिक ग्रहांचे मिलन होते तेव्हा त्यातून राजयोगांची निर्मिती होत असते. असाच एक दुर्लभ असा शुक्रादित्य योग येत्या दिवसात तयार होणार आहे. पंचांगानुसार १३ एप्रिलला सूर्याचे आपल्या उच्च प्रभावाच्या मेष राशीत गोचर होणार आहे तर २४ एप्रिलला शुक्र मेष राशीत येईल. हे दोन्ही ग्रह एकत्र येताच यातून शुक्रादित्य राजयोग निर्माण होणार आहे. शुक्र हा प्रेम, धन, वैभवाचा कारक मानला जातो तर सूर्य हा आत्मविश्वासाचा, तेजाचा दूत मानला जातो. या दोन्ही ग्रहांच्या युतीने हे सर्व लाभ प्रभावित राशींना मिळण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल १८ महिन्यांनी म्हणजेच दीड वर्षांनी असा योगायोग जुळून येत आहे. या महत्त्वाच्या राजयोगाचा फायदा नेमका कोणत्या राशींना होऊ शकतो हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रादित्य योग बनल्याने तुमच्या कुंडलीत लाभाची चिन्हे आहेत का?

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

शुक्रादित्य राजयोग हा तूळ राशीच्या गोचर कुंडलीत सप्तम स्थानी तयार होत आहे. येत्या काळात तूळ राशीच्या वैवाहिक जीवनावर या राजयोगाचा प्रभाव दिसून येऊ शकतो. लग्न करू इच्छिणाऱ्यांना सुद्धा या कालावधीत एखादी शुभ वार्ता मिळू शकते. कुटुंबासह आनंदाचे क्षण घालवाल. नात्यागोत्यांमधून अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होण्यास गती मिळेल. भागीदारीत केलेल्या व्यवसायातुन अधिक नफा होऊ शकतो. अडकून पडलेले पैसे परत मिळाल्याने अनपेक्षित स्वरूपात आर्थिक बळ लाभेल. गुंतवणुकीसाठी हा कालावधी उत्तम! आत्मविश्वासात सुद्धा वाढ होईल.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

शुक्रादित्य राजयोग सिंह राशीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतो. सिंह राशीच्या कुंडीत नवव्या स्थानी हा राजयोग तयार होत आहे. आपल्याला नशिबाची साथ तर लाभेलच पण मनातही सकारात्मक विचार येऊ लागतील. वेळ पाळण्याच्या सवयीचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला एखादा सन्मान प्राप्त होऊ शकतो,आपल्या कामाची दखल वरिष्ठांकडून घेतली जाऊ शकते. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर सुद्धा शुभ प्रभाव होण्याची चिन्हे आहेत. धार्मिक व मंगल कार्यातील आवड वाढेल. परदेश यात्रेचा योग आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये यश हाती येऊ शकते.

हे ही वाचा<< उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत ‘१ मे’ला मोठा बदल, यश येईल भाळी; ज्योतिषी उल्हास गुप्ते सांगतायत नेमकं घडणार काय?

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

शुक्रादित्य राजयोगाचा सर्वात मोठा फायदा हा मेष राशीच्या लोकांना होणार आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, शुक्र व सूर्याची युती ही मुळात तुमच्याच राशीच्या घरी होत आहे. त्यामुळे गिचार कुंडलीत अगदी प्रथम भावात हा प्रभाव कायम असणार आहे. जोपर्यंत ही युती कायम असेल तोपर्यंत तुमच्या व्यक्तिमत्वात अनेक बदल होत राहतील. तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. बोलण्यात नवा आत्मविश्वास येऊ शकतो. तुमची आजवर अडकून राहिलेली कामे केवळ तुमच्या बोलण्याने पूर्ण होऊ लागतील. तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती व पगारवाढ लाभू शकते. जोडीदारासाठी आपण लकी सिद्ध व्हाल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18 months later shukraditya rajyog in mesh these zodiac signs luck will shine from 24th april ma lakshmi blessing love money astro svs
First published on: 08-04-2024 at 10:02 IST