18th April Panchang & Rashi Bhavishya: १८ एप्रिल २०२४ ला चैत्र शुक्ल पक्षातील दशमी तिथी असणार आहे. यादिवशी सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत आश्लेषा नक्षत्र जागृत असणार आहे. यादिवशी सूर्य मेष राशीत असणार आहे आणि चंद्र कर्क राशीत स्थिर असेल. राहु काळ दुपारी १ वाजून ५८ मिनिटांपासून ते ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असेल. तर अभिजात मुहूर्त ११ वाजून ५५ मिनिटांनी सुरु होऊन १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असेल. पंचांग व ज्योतिषशास्त्रानुसार १८ एप्रिलला मेष ते मीन राशींच्या नशिबात नेमकं काय लिहून ठेवलंय हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८ एप्रिल २०२४: पंचांग व राशी भविष्य

मेष:-मनाची चंचलता जाणवेल. कुठल्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. सर्व कामे तत्परतेने कराल. योग्य तर्क लावता येईल.

वृषभ:-फार विचार करू नये. चोरांपासून सावध रहा. अनाठायी खर्च होऊ शकतो. आवडी निवडीवर अधिक भर द्याल. झोपेची तक्रार जाणवेल.

मिथुन:-चित्त एकाग्र करावे लागेल. मनावर कुठल्या तरी गोष्टीचा ताण राहील. तब्येतीची वेळेवर तपासणी करून घ्यावी. लहानांच्यात लहान होऊन रमाल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

कर्क:-भावनेला आवर घालावी लागेल. पत्नीचे प्रभुत्व राहील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. कामात मित्रांचे सहकार्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

सिंह:-चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. स्नायू धरणे यांसारखे त्रास संभवतात. वडीलधार्‍यांचा योग्य तो मान राखाल. प्रवासाची आवड पूर्ण होईल.

कन्या:-भावंडांची काळजी लागून राहील. कामात एकसूत्रता ठेवावी. घरगुती कामाचं ओझं उचलाल. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. जोडीदाराबाबत गैरसमज करू नयेत.

तूळ:-घरात काही बदल करावे लागतील. स्थावरची कामे पुढे सरकतील. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. भागीदारीतील लाभ उठवाल.

वृश्चिक:-तुमच्या कामाचा जोम वाढेल. धाडस करताना सारासार विचार करावा. कमी वेळात कामे पूर्ण करण्यावर भर द्याल. मनातील अकारण भीती बाजूस सारावी. भावंडांना मदत करावी लागेल.

धनू:-हातातील कामात यश येईल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे लागेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. वादविवादात भाग घेऊ नका. कोर्ट कचेरीची कामे निघतील.

मकर:-नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कामातील क्षुल्लक अडचणी दूर कराव्यात. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. उत्साहाने कामे हाती घ्याल. उगाच चिडचिड करू नका.

कुंभ:-कामानिमित्त प्रवास करावा लागेल. तुमच्यावर नवीन कामांचा भार पडेल. धैर्य व चिकाटी सोडू नका. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. इतरांना तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल.

हे ही वाचा<< अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी

मीन:-घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून वागाल. कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पूर्ण कराल. हातातील कलेसाठी वेळ द्याल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18th april panchang rashi bhavishya libra cancer zodiac mesh to meen daily marathi horoscope abhijat muhurta who will earn money love svs
First published on: 17-04-2024 at 19:02 IST