18th January Marathi Horoscope: आज १८ जानेवारीला गुरूपुष्यामृत योग जुळुन आला आहे. ग्रहमानानुसार, नेमक्या कोणत्या राशींना लाभ होऊ शकतो हे पाहुया, वाचा मेष ते मीन या १२ राशींचे आजचे भविष्य..

मेष:-ताणतणाव बाजूला सारावेत. घरातील गोष्टीत अधिक लक्ष घाला. नवीन मित्र जोडाल. कामात स्त्रियांची मदत घ्याल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.

वृषभ:-कामातील घाई उपयोगाची नाही. वैचारिक स्थिरता ठेवावी. प्रवासात काळजी घ्यावी. संयम बाळगावा लागेल. प्रलोभनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

मिथुन:-कौटुंबिक विचाराला प्राधान्य द्यावे. अपचनाचा त्रास जाणवेल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. शांतपणे विचार मांडावेत. भौतिक गोष्टींचा फार विचार करू नका.

कर्क:-भावनेला आवर घालावी लागेल. मुलांचा व्रात्यपणा वाढेल. मैदानी खेळ खेळाल. अंगातील जोम वाढेल. काही कामे विनासायास पार पडतील.

सिंह:-बौद्धिक दृष्टीने विचार करावा. गूढ गोष्टी जाणून घेण्यात रस दाखवाल. लेखनाला चांगला उठाव मिळेल. लबाड लोकांपासून दूर राहावे. शैक्षणिक कामे पार पडतील.

कन्या:-तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. गप्पांची आवड पूर्ण कराल. संभाषण कौशल्य दाखवता येईल. मित्रांचा गोतावळा जमवाल. नातेवाईकांची गाठ पडेल.

तूळ:-चौकसपणे गोष्टी जाणून घ्याल. ज्ञानात भर पडेल. सतत काहिनाकाही विचार करत राहाल. योग्य परीक्षण करावे लागेल. उत्तम लिखाण करता येईल.

वृश्चिक:-कमिशनच्या कामातून लाभ मिळवाल. बौद्धिक दृष्टीने विचार मांडाल. सर्वांशी लाघवीपणे बोलाल. चिकाटी सोडू नका. जुनी कामे डोकेवर काढतील.

धनु:-सर्वबाबी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. हजरजबाबीपणा दाखवाल. गोड बोलून कामे पूर्ण करून घ्याल. अति चिकित्सा करू नका. कामात तत्परता दाखवावी.

मकर:-अघळपघळ बोलू नये. धार्मिक गोष्टीत लक्ष घालाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. आपल्याच मतावर आग्रही राहू नका. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.

कुंभ:-गप्पीष्ट लोकांमध्ये वावराल. लहनांशी मैत्री कराल. मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल. मोठ्या लोकांमध्ये उठबस वाढेल. दिवस मानाजोगा जाईल.

हे ही वाचा<< लक्ष्मी नारायण येती घरा! बुध शुक्र युतीमुळे ‘या’ राशीचे लोकांना लाभेल कोट्यधीशांचे नशीब; कसा होईल लाभ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन:-बौद्धिक चातुर्य दाखवाल. कल्पकतेने विचार कराल. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. व्यवहार चातुर्य दाखवाल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल.

  • ज्योतिषी विद्याधर करंदीकर